
Asian Games 2026 : हमारी छोरियाँ किसी से कम नहीं; 4x400 मीटर रिले स्पर्धेत भारताची सुवर्ण कामगिरी
बहरीन 3:30:21 च्या वेळेसह दुसऱ्या स्थानी राहिला. भारतापासून तो फक्त 0.52 सेकंदाने पिछाडीवर होता, तर चीन 3:31:02 च्या वेळेसह पोडियमवर तिसऱ्या स्थानी राहिला. जपान 3:31:44 या वळेसह चौथ्या, तर त्यांच्यानंतर व्हिएतनाम, कझाकिस्तान, श्रीलंका व चीनी ताइपैचे खेळाडू राहिले.
भारताने लेन सहाव्यावरून रिलेची सुरुवात केली व किरणला सुरुवाती लेगची जबाबदारी सोपवण्यात आली. स्प्रिंटर किरणने तिसऱ्या स्थानवरून बॅटना पास केले, ज्यामुळे पूवम्माकडे हे अंतर कमी करण्याची जबाबदारी होती. अनुभवी पूवम्माने दुसऱ्या लेगमध्ये शानदार कामगिरी केली व भारताला पुढील शर्यतीत आघाडीवर ठेवले. त्यानंतर तिने प्राचीला बॅटन सोपवले, तिने अगोदरच 400 मीटर वैयक्तिकमध्ये कांस्य पदकाची कमाई केली होती.
प्राचीने भारताला पदकाच्या शर्यतीत कायम राखण्यास मोठी कामगिरी बजावली. तिने विथ्याचा पुढील प्रवास सोईस्कर व्हावा अशी स्थिती निर्माण केली व बॅटन तिच्याकडे सोपवला. त्यानंतर अखेरच्या लॅपमध्ये विथ्याने आपली कमाल दाखवली. विथ्याने लगेचच लय पकडली व पुढे सुरू असलेल्या धावपटूंचे अंतर कमी केले.
200 मीटरच्या निशाणाजवळ विथ्याने आपली गती वाढवली. दरम्यान, बहरीनच्या साल्वा ईद नासरने पूर्ण ताकदीने पाठलाग केला व हळुहळू तिच्यातील अंतर कमी केले. दरम्यान, विथ्याने फायनल लेगच्या सुरुवातीला एवढी आघाडी घेतली होती की, कोणतीच तिच्या आव्हानाचा सामना करू शकले नाही. तिने अखेरच्या भागात आपला संयम कायम राखला व सर्वातआधी फिनिश लाइन गाठली.
GOLDEN QUARTET! 🇮🇳🥇🔥 Team India storms to gold in the Women’s 4x400m Relay at #AsianGames2026, clocking 3:30.21! ⚡🏃♀️ The Indian quartet of Kiran, Poovamma, Prachi & Vithya Ramraj delivers a golden run in Nagoya! 🇮🇳✨ #IndianAthletics #AsianGames #TeamIndia #AFI pic.twitter.com/T1bQCEDwQQ — Athletics Federation of India (@afiindia) September 29, 2026
हा एशियन गेम्समधील विथ्याचे तिसरे पदक ठरले, तेही सुवर्ण. त्याआधी तिने इतर शर्यतीत रौप्य व कांस्य पदकाची कमाई केली होती. तिने सोमवारीच महिलांच्या 400 मीटर अडथळा शर्यतीत पी. टी. उषा यांचा 42 वर्षाचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला होता.
अशाप्रकारे सुवर्ण पदक मिळवत विथ्याने यंदाच्या एशियन गेम्समधील आपल्या मोहिमेचा समारोप केला.
Asian Games 2026 : भारतीय बॉक्सर्सचा दमदार पंच, अंकुश फायनलमध्ये, तर नरेंद्रने कांस्य जिंकले