फोटो सौजन्य - Cricket Australia
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान : ४ नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. या दोन्ही संघामध्ये T20 मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तीन T20 सामान्यांची मालिका होणार आहे. पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या 3 सामन्यांच्या T20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. मात्र, कर्णधाराची घोषणा नंतर केली जाणार आहे. T20 संघाचा कर्णधार मिचेल मार्शसह कसोटी खेळणारे खेळाडू या मालिकेचा भाग असणार नाहीत. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी सुरू होईल त्याच आठवड्यात ही मालिका संपणार आहे. त्यामुळे अजुनपर्यत ऑस्ट्रेलियाचा संघ घोषित केला आहे परंतु कर्णधार कोण असणार याचा खुलासा करण्यात आला आहे. अंतिम T20 सामना 18 नोव्हेंबरला होबार्टमध्ये खेळवला जाणार आहे, तर भारत विरुद्धचा पहिला कसोटी सामना 22 नोव्हेंबरला सुरू होईल. अशा स्थितीत कसोटी संघातील खेळाडूंची निवड झालेली नाही.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी लक्षात घेऊन ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू या T20 मालिकेतून विश्रांती घेताना दिसणार आहेत. या संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली असून, ते पाकिस्तानविरुद्ध खेळताना दिसणार आहेत.
मिचेल मार्शच्या जागी जोश इंग्लिस, ॲडम झाम्पा आणि मॅथ्यू शॉर्ट यांचा पाकिस्तानविरुद्ध T20 कर्णधार म्हणून समावेश करण्यात आला आहे. ब्रिस्बेन, सिडनी आणि होबार्ट येथे होणाऱ्या सामन्यांसाठी 13 सदस्यीय संघात निवडण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये याआधी कोणत्याही फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद भूषवलेले कोणीही नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्डाला कर्णधाराची नियुक्ती करावी लागणार आहे. रविवारी 28 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानच्या संघाची घोषणा करण्यात आली.
पॅट कमिन्स एकदिवसीय आणि कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करताना दिसत आहे. त्यामुळे T20 फॉरमॅटमध्ये मार्श संघाचे नेतृत्व करताना दिसत आहे. अशा स्थितीत भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेमुळे एकही वरिष्ठ खेळाडू उपलब्ध नाही. वरिष्ठ खेळाडूंच्या जागी युवा खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे, तर ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस आणि ॲडम झाम्पा या वरिष्ठ खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे. अशा स्थितीत आता मॅक्सवेल किंवा मार्कस यांच्यापैकी कोणीही संघाचे नेतृत्व करू शकतो, याचा अंदाज लावला जाऊ शकतो. तर यष्टीरक्षक फलंदाज जोश इंग्लिश देखील कर्णधारपदाचा दावेदार असून तो संघाचे नेतृत्व करताना दिसतो.
शॉन ॲबॉट, झेवियर बार्टलेट, कूपर कोनोली, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, आरोन हार्डी, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टॉइनिस, ॲडम झाम्पा
Introducing our Men’s T20I squad to take on @TheRealPCB next month 🇦🇺 🇵🇰 pic.twitter.com/5TdEF3EqMd
— Cricket Australia (@CricketAus) October 28, 2024
मोहम्मद रिझवान (कर्णधार), अब्बास आफ्रिदी, आगा सलमान, अराफत मिन्हास, बाबर आझम, हारिस रौफ, हसिबुल्ला खान, इरफान खान, जहानदाद खान, नसीम शाह, ओमेर युसूफ, साहिबजादा फरहान, शाहीन शाह आफ्रिदी, सुफियान मुकीम, उस्मान खान.