फोटो सौजन्य - X
बांग्लादेशचे नवे प्रशिक्षक शाॅन टेट : बांगलादेश क्रिकेट संघ आता पुढील मालिकाही युनायटेड अरब यांच्या विरोधात खेळणार आहे. या मालिकेची सुरुवात 19 मे पासून केली जाणार आहे. बांगलादेशचा संघ युनायटेड अरब विरुद्ध दोन t20 सामने खेळणार आहे. यामध्ये पहिला सामना हा 17 मे रोजी खेळावला जाणार आहे तर दुसरा सामना १९ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यानंतर बांगलादेशचा संघ पाकिस्तान विरुद्ध देखील टी-20 मालिका खेळणार आहे यामध्ये या मालिकेत बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये पाच सामने खेळवले जाणार आहेत. त्याआधी बांगलादेश संघात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आता ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज वेगवान गोलंदाजावर एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने शॉन टेटवर संघाचं नवे वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. 42 वर्षीय शॉन टेट हे बांगलादेशसाठी पुढील मालिकांमध्ये महत्त्वाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहेत. बांगलादेशने हेही सांगितलं आहे की शॉर्ट टेट हे नोव्हेंबर 2027 पर्यंत संघाची जबाबदारी पार पडताना दिसणार आहेत. शॉन टेट यांनी याआधी पाकिस्तान वेस्टइंडीज आणि अफगाणिस्तान साठी देखील काम केले आहे.
शॉन टेट हा ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या गोलंदाजांपैकी एक मानला जात असे. त्याने आपल्या देशासाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. टेटची कृती अद्भुत होती. तो विरोधी संघाविरुद्ध घातक गोलंदाजी करायचा. २००७ च्या विश्वचषकात टेटने ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. तो २००७ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता.
🚨 OFFICIAL
Shaun Tait becomes the fast-bowling coach of 🇧🇩!
Time to turn things ‘wild’ with the current fast-bowling line-up, especially with Nahid Rana. ⚡ pic.twitter.com/lZQkbpTbjY
— Cricketangon (@cricketangon) May 12, 2025
टेटने ऑस्ट्रेलियासाठी ३ कसोटी सामन्यांमध्ये ५ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याने ३५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ६२ विकेट्स घेतल्या आहेत. २१ टी-२० सामन्यांमध्ये या खेळाडूने २८ फलंदाजांच्या विकेट घेतल्या. तो त्याच्या वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जात असे.
बांगलादेश क्रिकेट संघाचे जलद गोलंदाजी प्रशिक्षक झाल्यानंतर टेट म्हणाले की, बांगलादेश क्रिकेट संघात सामील होण्यासाठी आता खूप चांगला वेळ आहे. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही याला एका नवीन युगाची सुरुवात म्हणू शकता. अलिकडच्या काळात याबद्दल बरीच चर्चा झाली आहे, जसे की तरुण वेगवान गोलंदाज आणि त्यांच्या प्रतिभेबद्दल, जे खरोखरच आश्चर्यकारक आहे.