Baba Aparajith Retirement: CSK च्या 'या' खेळाडूचा क्रिकेटला रामराम; IPL 2027 ऑक्शनपूर्वी घेतला मोठा निर्णय

Baba Aparajith announces retirement from first-class cricket at 32: आयपीएल २०२७ च्या लिलावापूर्वी, बाबा अपराजितने आपल्या क्रिकेट कारकिर्दीबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. सीएसकेच्या या माजी खेळाडूने अचानक निवृत्ती जाहीर केली आहे.
Baba Aparajith announces retirement
Baba Aparajith announces retirement Baba Aparajith announces retirement
Published on: 
Updated on: 
  • अंडर-१९ वर्ल्ड कप जिंकवणारा खेळाडूचा क्रिकेटला रामराम

  • बाबा अपराजितने जाहीर केली निवृत्ती

  • भावनिक पोस्ट करत दिली माहिती

Baba Aparajith Retirement: आयपीएल २०२७ च्या मिनी लिलावापूर्वी, ३२ वर्षीय क्रिकेटपटू बाबा अपराजितने निवृत्ती जाहीर केली आहे. अपराजितने २०११ मध्ये तामिळनाडू संघाकडून प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तो संघाचा एक महत्त्वाचा भाग बनला.

आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपर किंग्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स या संघांचा भाग होता. १५ वर्षांच्या अविस्मरणीय प्रवासानंतर, बाबा अपराजित आता निवृत्त झाला आहे. त्याने एक भावनिक पोस्ट शेअर करून आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे.

बाबा अपराजितने जाहीर केली निवृत्ती

बाबा अपराजितने इंस्टाग्रामवर आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील काही अविस्मरणीय क्षणांचे फोटो पोस्ट केले आणि बीसीसीआयसह सर्व संघ आणि सहकाऱ्यांचे आभार मानत निवृत्तीची घोषणा केली.

त्याने पोस्टमध्ये लिहिले की, 'मी माझा शेवटचा प्रथम-श्रेणी सामना २४ जानेवारी २०२६ रोजी खेळलो. मी आता अधिकृतपणे माझी प्रथम-श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आहे . हा माझ्यासाठी एक अद्भुत प्रवास होता. येथे मला विविध अनुभव, आव्हाने, शिकवण, मैत्री आणि अशा आठवणी मिळाल्या ज्या मी नेहमी जपून ठेवीन. मला तामिळनाडू, भारतीय १९ वर्षांखालील संघ, इंडिया 'अ', केरळ, चेन्नई सुपर किंग्स, रायझिंग पुणे सुपरजायंट्स, टीएनपीएल फ्रँचायझी आणि क्लब संघांसाठी खेळण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे. या सर्व ड्रेसिंग रूममध्ये मला माझी कारकीर्द घडवण्यात मदत झाली.'

अपराजित पुढे म्हणाला की, 'प्रत्येक अनुभवाने माझे आयुष्य घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. माझ्या संपूर्ण कारकिर्दीत मला संधी दिल्याबद्दल आणि पाठिंबा दिल्याबद्दल मी बीसीसीआय, टीएनसीए आणि केसीए यांचे आभार मानतो. तसेच, मी माझी पत्नी, आई-वडील, भाऊ, मित्र आणि कुटुंबीय यांचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल आणि त्यागाबद्दल आभार मानतो. या प्रवासात माझ्या सर्व सहकाऱ्यांकडून, प्रशिक्षकांकडून आणि सपोर्ट स्टाफकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल मी कृतज्ञ आहे. खेळाशी असलेले माझे नाते घट्ट राहील. मी शिकत राहीन आणि खेळासाठी योगदान देत राहीन.'

Baba Aparajith announces retirement
भाऊ, Hitman is Back! रोहित शर्माच पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार? MI च्या एका फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ

बाबा अपराजितची कारकीर्द

बाबा अपराजितची क्रिकेट कारकीर्द शानदार राहिली आहे. तो २०१२ मध्ये भारताच्या अंडर-१९ विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता. त्याने या स्पर्धेत १७१ धावा केल्या आणि ५ विकेट्स घेतले. तो अनेक वर्षे तामिळनाडू संघाकडून खेळला. त्यानंतर तो केरळ संघात सामील झाला. त्याने दोन वर्षे केरळ संघाकडून क्रिकेट खेळले.

अपराजित आणि त्याचा भाऊ बाबा इंद्रजित यांनी २०१७ मध्ये तामिळनाडूसाठी विजय हजारे ट्रॉफी जिंकली. ते २०२०-२१ आणि २०२१-२२ मध्ये तामिळनाडूच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी विजेत्या संघाचाही भाग होते. अपराजितने १०२ प्रथम-श्रेणी सामने खेळून ५,१९९ धावा केल्या आणि ७५ विकेट्स घेतले.

Baba Aparajith announces retirement
Big Breaking: क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं घडणार! एकाच टीममध्ये पुरुष-महिला खेळणार; Zaheer khan च्या 'Equal' ची घोषणा