भाऊ, Hitman is Back! रोहित शर्माच पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार? MI च्या एका फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Indians Hints Rohit Sharma As new Captain: आयपीएल २०२७ च्या आधी मुंबई इंडियन्स रोहित शर्माला पुन्हा एकदा कर्णधार बनवू शकते. याचे संकेत मुंबई इंडियन्सने एका सोशल मीडिया पोस्टद्वारे दिले आहेत.
Mumbai Indians Hints Rohit Sharma As new Captain
Mumbai Indians Hints Rohit Sharma As new Captainरोहित शर्माच पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार
Published on: 
Updated on: 
  • मुंबई इंडियन्सचा पुढचा कॅप्टन कोण?

  • रोहित शर्माच्या नावाने चर्चांना जोर

  • MI च्या एका पोस्टने दिले मोठे संकेत

Rohit Sharma: आयपीएल २०२७ च्या आधी, मुंबई इंडियन्स संघात मोठे बदल होत आहेत. काही आठवड्यांपूर्वी, कायरन पोलार्डची नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. याव्यतिरिक्त, भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग ट्रेडद्वारे एमआयमध्ये सामील झाला. हार्दिक पांड्याच्या ट्रेडनंतर, मुंबई इंडियन्स नवीन कर्णधाराच्या शोधात आहे.

रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबईचा कमान सांभाळू शकतो असे वृत्त समोर आले होते. परंतु संघाने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नव्हती. परंतु, आता मुंबई इंडियन्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. यानंतर, रोहित शर्मा कर्णधार होणार असल्याच्या चर्चांनी पु्न्हा एकदा जोर धरला आहे.

मुंबई इंडियन्सची सोशल मीडियावर खास पोस्ट?

माजी कर्णधार हार्दिक पांड्याच्या ट्रेडनंतर, मुंबई इंडियन्सला नव्या कर्णधाराची गरज आहे. संघाकडे अनेक पर्याय आहेत. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि जसप्रीत बुमराह यांच्या रूपाने एमआयकडे काही प्रमुख दावेदार आहेत. पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या या संघाचे नेतृत्व कोण करणार, याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. मुंबई इंडियन्सने अलीकडेच सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. यामधून नव्या कर्णधाराबद्दल संकेत मिळत आहेत. त्यांनी हातात एमआयची टोपी घेऊन उभ्या असलेल्या एका खेळाडूचा फोटो पोस्ट केला आहे. तो खेळाडू रोहित असू शकतो, असा अंदाज चाहते लावत आहेत.

रोहित पुन्हा होणार मुंबईचा कॅप्टन?

रोहित शर्माने अनेक वर्षे मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भूषवले. आयपीएल २०१७ चा अंतिम सामना जिंकल्यानंतर त्याने टोपी काढून धावत जाऊन ऐतिहासिक जल्लोष केला होता. रोहितने अनेकदा सामने जिंकल्यानंतर, हातात टोपी घेऊन जल्लोष केला आहे. आता, मुंबई इंडियन्सने असाच एक हातात टोपी धरलेला फोटो पोस्ट केला आहे. ज्यावरून 'हिटमॅन' पुन्हा एकदा संघाची सूत्रे हाती घेऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत.

Mumbai Indians Hints Rohit Sharma As new Captain
Big Breaking: क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं घडणार! एकाच टीममध्ये पुरुष-महिला खेळणार; Zaheer khan च्या 'Equal' ची घोषणा

एमआय पुन्हा रोहित शर्मावर विश्वास दाखवणार?

आयपीएल २०२६ पासून हार्दिक पांड्याच्या ट्रेडच्या अफवा पसरत आहेत. काही आठवड्यांपूर्वी तो ट्रेडद्वारे पंजाब किंग्समध्ये सामील झाला, तर अर्शदीप सिंग मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाला. हार्दिक गेल्या तीन हंगामांपासून एमआयचा कर्णधार होता आणि त्याच्या जाण्यामुळे नवीन कर्णधाराबद्दल चर्चा सुरू झाली आहे.

वृत्तानुसार, रोहित शर्माने युवा स्टार तिलक वर्माचे नाव नवीन कर्णधार म्हणून सुचवले होते. परंतु, मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२७ साठी कर्णधारपद स्वीकारण्याची विनंती रोहितला केली आणि रोहितने ती स्वीकारली. मुंबई इंडियन्सने अद्याप कर्णधाराची अधिकृत घोषणा केलेली नाही, परंतु लवकरच हे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. रोहितच्या कर्णधारपदाखाली मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.

Mumbai Indians Hints Rohit Sharma As new Captain
IND vs NZ: दुसऱ्या कसोटीत कर्णधार गिलचा मोठा गेमप्लॅन! सिराजचं कमबॅक, प्रसिद्ध कृष्णाचा पत्ता कट? कशी असेल भारताची संभाव्य Playing 11