भारत नेदरलँड यांच्यात सुरु असलेल्या टी २० विश्वचषकातील दुसऱ्या सामन्यात भारताने दिलेल्या १८० धावांचा डोंगर सर करताना नेदरलँड संघाची सुरुवात खराब झाली. पॉवर प्लेच्या तिसऱ्या षटकात भुवनेश्वर कुमारने नेदरलँडला पहिला धक्का दिला. त्याने विक्रमजीत सिंगला अवघ्या १ धावावर बाद केले. तर पॉवर प्लेच्या पाचव्या षटकात अक्षर पटेलने मॅक्स ओडोडचा १६ धावांवर त्रिफळा उडवत भारताला दुसरे यश मिळवून दिले.