फोटो सौजन्य - सोशल मीडिया
चॅम्पियन ट्रॉफीसाठी बांग्लादेशचा संघ : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा शुभारंभ १९ फेब्रुवारीपासून होणार आहे. यासाठी बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. यामध्ये बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने दोन धक्कादायक निर्णय घेतले आहेत. आपल्या गोलंदाजीमुळे चर्चेत असलेला शक्तिशाली अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसनला बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बांगलादेश क्रिकेट संघाच्या संघातून वगळले आहे. नजमुल हुसेन शांतो याला बांगलादेशच्या १५ सदस्यीय संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. बांगलादेश संघ 20 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. बांगलादेशचा पहिला सामना टीम इंडियासोबत होणार आहे.
गेल्या काही काळापासून अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन त्याच्या गोलंदाजीमुळे चर्चेत आहे. इंग्लंडमध्ये देशांतर्गत क्रिकेट खेळताना शाकिबवर त्याची गोलंदाजी कायदेशीर नसल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर शाकिबला गोलंदाजीतून निलंबित करण्यात आले. आता शाकिबला बॉलिंग ॲक्शन चाचणी द्यावी लागली, ज्यामध्ये तो नापास झाला. ज्याचा खुलासा बांगलादेश क्रिकेट बोर्डाने केला आहे. आता त्याला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बांगलादेश संघातही संधी मिळालेली नाही. शाकिबशिवाय यष्टीरक्षक फलंदाज लिटन दासलाही चॅम्पियन्स ट्रॉफी संघात संधी मिळालेली नाही.
🚨 NO SHAKIB AL HASAN & LITON DAS IN CT
– Shakib Al Hasan and Liton Das dropped from Bangladesh’s squad for Champions Trophy 2025. 🤯#RohitSharma #ShubmanGill #ViratKohli #KLRahul #INDvsENG #GautamGambhir #Siraj #ChampionsTrophy2025 pic.twitter.com/4uaEbBbEEa
— Monish (@Monish09cric) January 12, 2025
नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), सौम्या सरकार, तनजी हसन, तौहीद हृदोय, मुशफिकुर रहीम, एमडी महमूद उल्ला, झेकर अली अनिक, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, परवेझ हुसेन इमोन, नसुम अहमद, तन्झीम हसन साकब , नाहिद राणा
Bangladesh Squad for ICC Men’s Champions Trophy 2025#BCB #Cricket #ChampionsTrophy #Bangladesh pic.twitter.com/GtO9UtNihp
— Bangladesh Cricket (@BCBtigers) January 12, 2025
20 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई
24 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी
27 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी
चॅम्पियन ट्रॉफीचे यजमान पद पाकिस्तानकडे आहे. चॅम्पियन ट्रॉफी हायब्रीड पद्धतीने खेळवली जाणार आहे. या स्पर्धेचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. सेमीफायनलचा पहिला सामना ४ मार्च रोजी होणार आहे तर दुसरा सेमीफायनलचा सामना ५ मार्च रोजी खेळवला जाणार आहे. फायनलचा सामना ९ मार्च रोजी होणार आहेत. जर भारताचा संघ फायनलमध्ये गेला तर सामना दुबईला होईल आणि टीम इंडिया फायनलमध्ये नसल्यास पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.