फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बांग्लादेश विरुद्ध पाकिस्तान : बांग्लादेश विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये मालिका सुरु आहे, या मालिकेमधील पहिला सामना पार पडला आहे. या सामन्यामध्ये बांग्लादेशच्या संघाने १० विकेट्सने विजय मिळवला होता. त्यामुळे आता बांग्लादेशच्या संघाकडे १-० अशी आघाडी आहे. त्यानंतर जगभरामध्ये बांग्लादेशच्या संघाची वाहवाह होत होती. आता या दोन्ही संघांमधील आता दुसरा कसोटी सामना सुरु आहे. यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये रावळपिंडीमध्ये मुसळधार पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला होता. परंतु हा सामना पाकिस्तान संघासाठी महत्वाचा असणार आहे, कारण या सामन्यामध्ये जर बांग्लादेशच्या संघाचा विजय झाला तर संघ मालिका नावावर करेल. याउलट जर पाकिस्तानच्या संघाला बरोबरी करायची असेल तर संघाला हा सामना जिंकणे गरजेचे आहे. आतापर्यत या दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये काय झाले यावर नजर टाका.
बांग्लादेशचा कर्णधार शांतोने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. फलंदाजीचे आव्हान स्वीकारत पाकिस्तानच्या संघाने पहिल्या इनिंगमध्ये २७४ धावा केल्या होत्या. त्यानंतर बांग्लादेशच्या संघाने आव्हान स्वीकारत २६२ धावा केल्या आणि संघ सर्वबाद झाला. आता तिसऱ्या दिनाच्या दिवशी पाकिस्तानचा संघ पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरेल आणि तिसऱ्या दिनाच्या अखेरीस संघाने दुसऱ्या इनिंगमध्ये ३.४ षटकांमध्ये ९ धावा करत २ विकेट्स गमावले आहेत. सध्या पाकिस्तानच्या संघाकडे २१ धावांची आघाडी आहे.
बांग्लादेशचा दमदार फलंदाज लिटन दास याने बांग्लादेशच्या पहिल्या इनिंगमध्ये धमाकेदार कामगिरी केली. यामध्ये त्याने २२८ चेंडूंमध्ये १३८ धावा केल्या आणि संघाला मजबूत स्थितीमध्ये उभे केले. त्याचबरोबर बांग्लादेशचा २६ वर्षीय खेळाडू मेहदी हसन मिराज याने १२४ चेंडूंमध्ये ७८ धावा केल्या आहेत. आज काही वेळामध्येच पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश यांच्यामधील सामना सुरु होईल. आज सामन्याचा चौथा दिवस असणार आहे. त्यामुळे आजच्या दुसऱ्या इनिंगमध्ये पाकिस्तानचा संघ किती धावा करतो यावर क्रिकेट प्रेमींचे लक्ष्य असणार आहे.