Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बांगलादेशचा धुव्वा, 164 धावांवर आटोपला खेळ; श्रीलंकेच्या भेदक माऱ्यापुढे फलंदाजांची घसरगुंडी

  • By युवराज भगत
Updated On: Aug 31, 2023 | 06:55 PM
बांगलादेशचा धुव्वा, 164 धावांवर आटोपला खेळ; श्रीलंकेच्या भेदक माऱ्यापुढे फलंदाजांची घसरगुंडी
Follow Us
Close
Follow Us:

BAN vs SL Asia Cup 2023 Live : बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या बांगलादेशची सुरुवात निराशाजनकच झाली. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या बांगलादेशची सुरुवात थोडी निराशाजनकच झाली. बांगलादेशची सलामी जोडीची सुरुवात अडखळत झाली. तान्झीद हसन हा शून्यावरच तंबूत परतला, त्यानंतर मोहम्मद नाईम याने 16 धावा करुन धनंजय डिसल्वाच्या चेंडूवर पॅव्हेलिनचा रस्ता धरला. त्यानंतर आलेला नजमुल हुसेन शांतो सध्या 52 धावांवर खेळत आहे. बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन हा अवघ्या 5 धावा करून मथिशा पथिराणाच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्यानंतर तोव्हीद हिदोयला शांकाने पायचित करून 20 धावांवर तंबूत पाठवले. सध्या  बांगलादेशचा विकेटकिपर मुस्तफिर रशिम आणि नजमुल हुसेन शांतो खेळत आहेत.

बांगलादेशच्या फलंदाजांची घसरगुंडी : मुस्तफीर राशिम विकेटकिपर आणि नजमुल हुसेन शांतो या दोघांमध्ये चांगली भागिदारी जमत असताना, मुस्तफीर मथीशा पथिरानाच्या गोलंदाजीवर करुणारत्नेद्वारे झेलबाद झाला. त्यानंतर आलेल्या मेहंदी हसन मीराझ अवघ्या 5 धावा करून रनआऊट झाला. त्यानंतर मेहंदी हसन हा पायचित होऊन अवघ्या 6 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर अक्षरशः फलंदाजांची रांगच लागली. केवळ औपचारिकता म्हणून फलंदाज मैदानात येत होते आणि जात होते. शेवटच्या फळीतील तास्कीन अहमद, शोरफुल इस्लाम, मुस्तफिर रेहमान हे 2 धावांच्या पुढे देखील गेले नाहीत. बांगलादेशच्या फलंदाजांची अक्षरशः दाणादाण उडाली.

बांगलादेश विरुद्ध श्रीलंका पहिल्यांदाच आमने-सामने
आशिया कप 2023 स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात बांगलादेश विरुद्ध श्रीलंका आमनेसामने आहेत. बांगलादेशने आशिया कप 2023 मधील पहिल्याच सामन्यात टॉस जिंकला आहे. बांगलादेश कॅप्टन शाकिब अल हसन याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता बांगलादेश टीम श्रीलंकेला विजयासाठी 50 ओव्हरमध्ये किती धावांचं आव्हान देतं, याकडे लक्ष असेल. या सामन्याला 3 वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्याचं आयोजन हे पल्लकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.
दोन्ही संघांना मोठा फटका
बांगलादेश आणि श्रीलंका हे दोन्ही संघ समदुखी आहेत, कारण त्यांचे खेळाडू दुखापतीच्या जाळ्यात अडकले आहेत. बांगलादेशचा विकेटकीपर सलामीवीर लिटॉन दास हा प्रकृती स्थिर नसल्याने आशिया कपमधून बाहेर झाला आहे. लिटॉन दास याच्या जागी बांगलादेश संघात अनामुल हक बिजॉय याचा समावेश करण्यात आलाय. मात्र श्रीलंका विरुद्धच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये विकेटकीपर म्हणून अनुभवी मुशफिकुर रहिम याला संधी देण्यात आली आहे.
आशिया कपसाठी निवड करता आली नाही
तर श्रीलंकेचे 4 खेळाडू हे दुखापती असल्याने त्यांची आशिया कपसाठी निवड करता आली नाही. दिलशान मदुशंका, लाहिरु कुमारा, वानिंदु हसरंगा आणि दुष्मंथा चमीरा या चौघांना दुखापतीमुळे आशिया कपपासून दूर रहावं लागलं आहे. त्यामुळे आशिया कपआधीच दोन्ही संघांसाठी हा मोठा झटका समजला जात आहे.
पल्लकेलेमधील 8 एकदिवसीय सामन्यांबाबत
दरम्यान पल्लेकले या मैदानात वनडे सामन्यांमध्ये 295 हा एव्हरेज स्कोअर आहे. म्हणजेच या मैदानात किमान इतका स्कोअर होतोच. पल्लेकले इथे 2018 पासून आतापर्यंत 8 एकदिवसीय सामने झाले आहेत. त्यापैकी पहिले बॅटिंग करणाऱ्यांचा 5 वेळा विजय झाला आहे. तर 3 वेळा धावांचा पाठलाग करणारी टीम जिंकली आहे. त्यामुळे आता या सामन्यात कोण जिंकतं हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.
श्रीलंका प्लेईंग इलेव्हन | दासुन शानाका (कॅप्टन), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, कसुन राजिथा आणि मथीशा पाथिराना.
बांगलादेश प्लेईंग इलेव्हन | शाकिब अल हसन (कर्णधार), मोहम्मद नईम, तन्झिद हसन, नजमुल हुसेन शांतो, तौहीद ह्रदॉय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), मेहिदी हसन मिराझ, महेदी हसन, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम आणि मुस्तफिजुर रहमान.

Web Title: Bangladesh won the toss and elected to bat watch ban vs sl asia cup 2023 live updates nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2023 | 05:08 PM

Topics:  

  • shakib al hasan

संबंधित बातम्या

शाकिब अल हसनने टी20 क्रिकेटमध्ये उमटवला ठसा! 500 विकेट्ससह रचला विश्वविक्रम
1

शाकिब अल हसनने टी20 क्रिकेटमध्ये उमटवला ठसा! 500 विकेट्ससह रचला विश्वविक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.