नवी दिल्ली : बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी रिकी पाँटिंगने काल केलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना सांगितले की, BCCI भारतीय क्रिकेट बोर्डाने कोणत्याही माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूला प्रशिक्षकपदासाठी संपर्क साधला नाही. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ T20 विश्वचषकानंतर संपत आहे. या कारणाने बीसीसीआय टीम इंडियाच्या नवीन प्रशिक्षकाच्या शोधात आहे.
राहुल द्रविडला मुदवाढ नको असल्याने प्रशिक्षकपदासाठी शोध
राहुल द्रविडला त्याच्या कार्यकाळात मुदतवाढ नको आहे. अलीकडेच, ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि जस्टिन लँगर यांनी सांगितले होते की, या पदासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता. परंतु, त्यांनी बीसीसीआयची ऑफर नाकारली.
रिकी पाँटिंग आणि जस्टिन लँगर खोटे बोलाताहेत
जय शाह यांनी शुक्रवारी सांगितले की, ‘माझ्याकडून किंवा बीसीसीआयकडून कोणीही ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूला प्रशिक्षकपदासाठी संपर्क साधला नाही. रिकी पाँटिंग आणि जस्टिन लँगर हे इंडियन प्रीमियर लीगमध्ये अनुक्रमे दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्सचे प्रशिक्षक आहेत.
प्रमुख दावेदारांमध्ये गौतम गंभीरचे नाव अग्रेसर
राहुल द्रविडनंतर भारतीय प्रशिक्षकाची निवड करण्याबाबत इशारा देताना जय शाह म्हणाला, ‘राष्ट्रीय संघासाठी योग्य प्रशिक्षक शोधणे ही एक दीर्घ प्रक्रिया आहे. आम्ही अशा व्यक्तीच्या शोधात आहोत ज्याला भारतीय क्रिकेटच्या संरचनेची सखोल माहिती आहे आणि तो आपल्या कौशल्याने शीर्षस्थानी पोहोचला आहे. पुढील प्रशिक्षक, कोलकाता नाईट रायडर्सचा मार्गदर्शक आणि माजी फलंदाज गौतम गंभीरसुद्धा या पदासाठी प्रमुख दावेदार मानला जात आहे.
राहुल द्रविडला वर्षाला 10 कोटी रुपये पगार मिळतो.
बीसीसीआय प्रशिक्षकपदासाठी अर्ज जारी
बीसीसीआयने प्रशिक्षकासाठी अर्ज जारी केला आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे आहे. द्रविडचा कार्यकाळ गेल्या एकदिवसीय विश्वचषकासाठी होता पण नंतर त्याने तो वाढवला पण यावेळी द्रविडची मनःस्थितीत नाही. बीसीसीआय द्रविडला वर्षाला १० कोटी रुपये मानधन देते. द्रविड हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट प्रशिक्षक आहे.