

वैभव सूर्यवंशीने थोकल्या 204 रन्स
वैभव सूर्यवंशीने युवराज सिंगशी केलेली फोनवर chrcha
युवराज सिंगने वैभवबाबत केले महत्वाचे ट्वीट
Vaibhav Suryvanshi: रायझिंग स्टार्स आशिया कप 2026 स्पर्धेत सुरुवातीचे दोन सामने काहीसे अपयश आलेल्या वैभव सूर्यवंशीने यूएईविरुद्ध केवळ 52 बॉलमध्ये आपले दुहेरी शतक पूर्ण करत एक नवा रेकॉर्ड रचला आहे. सामना झाल्यावर सामना सुरू होण्याच्या आधी आपण 4 जणांशी फोनवर बोललो होतो असे सांगितल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग असल्याचे समोर येत आहे.
भारताच्या युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याच्या स्फोटक कामगिरीने सध्या क्रिकेटविश्वात मोठी खळबळ उडवून दिली आहे. आशिया कप राइजिंग स्टार्स स्पर्धेत त्याने अवघ्या ५२ बॉलमध्ये नवा रेकॉर्ड केला आहे. सामन्याच्या आधी वैभवने आपले वडिल, कोच आणि एका मित्राशी संवाद साधला. यानंतर माजी अष्टपैलू क्रिकेटर युवराज सिंग यांच्याशी वैभवने फोनवर संवाद साधला होता.
वाघाची IPL 2027 मध्ये दमदार एन्ट्री! 'या' संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून Yuvraj Singh ची नियुक्ती
युवराज सिंग यांच्याशी झालेल्या चर्चेविषयी बोलताना वैभवने सांगितले की, त्याने आपल्या फलंदाजीत येत असलेल्या अडचणी आणि समस्यांबाबत युवराज सिंग याच्याशी अगदी मनमोकळेपणाने चर्चा केली होती. त्यानंतर युवराज सिंगने त्याला काही गोष्टी समजावून सांगितल्या किंवा काय करू शकतो याबाबत सल्ला दिला होता.
वैभव सूर्यवंशीने जर 20 बॉल खेळले तर त्याने प्रत्येक बॉलवर काहीतरी वेगळ्या पद्धतीने खेळले पाहिजे असे युवराज सिंगने वैभवला सांगितल्याचे समजते. युवराज सिंगने दिलेला हा मोलाचा सल्ला वैभवच्या इनिंगमध्ये दिसून आला. त्याच्यासाठी हा सल्ला महत्वाचा ठरला.
भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या स्फोटकी खेळीनंतर माजी खेळाडू युवराज सिंगने सोशल मिडियावर पोस्ट करत वैभव सूर्यवंशीचे कौतुक केले आहे. वैभवच्या स्फोटक खेळीचे स्वागत करताना युवराज सिंगने आपल्या ट्वीटमध्ये '53 बॉलमध्ये द्विशतक , ही खरोखरच बेधडक फलंदाजी आहे. कठोर परिश्रम करत राहा, यापेक्षा अधिक चांगला गोष्टी यायच्या बाकी आहेत.
वैभव सूर्यवंशीने शानदार दुहेरी शतक ठोकले आहे. 52 बॉलमध्ये त्याने 204 रन्सची खेळी केली. सर्वाधिक सिक्स त्याने या सामन्यात मारले आहेत. वैभव सूर्यवंशीला गेले अनेक सामने संधी मिळत नव्हती. या स्पर्धेत देखील गेले 2 सामने तो काहीसा अपयशी ठरत असल्याचे दिसून आले. मात्र कालच्या सामन्यात त्याने सगळे अपयश धुवून काढले आहे. तसेच निवड समितीला देखील आपला फॉर्म सिद्ध दाखवल्याचे म्हटले जात आहे.
वैभव सूर्यवंशीने यूएईविरुद्ध किती चेंडूंमध्ये द्विशतक पूर्ण केले?
वैभव सूर्यवंशीने रायझिंग स्टार्स आशिया कप 2026 स्पर्धेत यूएईविरुद्ध अवघ्या 52 चेंडूंमध्ये आपले द्विशतक पूर्ण करत नवा विक्रम रचला.
वैभव सूर्यवंशीने सामना सुरू होण्यापूर्वी कोणत्या माजी भारतीय क्रिकेटपटूशी फोनवर संवाद साधला होता?
वैभव सूर्यवंशीने सामना सुरू होण्यापूर्वी चार जणांशी फोनवर संवाद साधला होता.