
BIG NEWS! India to host Commonwealth Games 2030! Battle to be played in Ahmedabad
India is honored to host the Commonwealth Games 2030 : भारत देशासाठी अभिमान वाटेल अशी बातमी समोर आली आहे. भारताला २०३० राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. ही स्पर्धा अहमदाबाद या शहरात खेळवण्यात येणार आहे. ग्लासगो येथे झालेल्या ७४ राष्ट्रकुल सदस्य देशांच्या महासभेत या भारताच्या यजमानपदावर शिक्कामोर्तब झाले आहे.
हेही वाचा : Ind vs Sa 2nd Test : ‘माझे भविष्य BCCI ठरवणार…’ गुवाहाटी कसोटी पराभवानंतर कोच गौतम गंभीरने स्पष्टच सांगितले…
भारताकडून २०३० राष्ट्रकुल स्पर्धेसाठी आपला एक आकर्षक दृष्टीकोन सादर करण्यात आला. ज्यासाठी अहमदाबादला नामांकन देण्यात आले होते. यासह, अहमदाबाद आपले १०० वे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा साजरे करण्यास सज्ज झाले आहे. कॉमनवेल्थ स्पोर्टकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की “अहमदाबादला २०३० च्या क्रीडा स्पर्धेचा मान मिळाला आहे. यावेळी २० गरबा नर्तक आणि ३० ढोलकी वाजवणारे असेंब्ली हॉलमध्ये दाखल झाले आणि त्यांनी नाचण्यास आणि गाण्यास सुरुवात केली. या सांस्कृतिक सादरीकरणाने उपस्थित असलेल्या इतर देशांतील प्रतिनिधी देखील चकित झाले.
भारतात शेवटचे २०१० मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्या आवृत्तीत भारतीय खेळाडूंनी १०१ पदके जिंकून ऐतिहासिक कामगिरी नोंदवली होती. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे पहिल्यांदा १९३० मध्ये कॅनडाने आयोजन केले होते. अहमदाबाद, भारत आता १०० व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यास तयार झाला आहे.
हेही वाचा : Syed Mushtaq Ali Trophy : ऋतुराज गायकवाडने लिहिला इतिहास! CSK च्या कर्णधाराने रेकॉर्ड बुकवर कोरले नाव
भारतासाठी राष्ट्रकुल खेळांचे आयोजन करणे महत्त्वाचे असणार आहे, कारण भारत २०३६ च्या ऑलिंपिक खेळांच्या यजमानपदाच्या शर्यतीत देखील आहे. राष्ट्रकुल खेळांचे अंतरिम अध्यक्ष डॉ. डोनाल्ड रुकारे यांनी सांगितले की, कार्यकारी मंडळाला भारत आणि नायजेरिया या दोन्ही देशांचे प्रस्ताव प्रेरणादायक वाटले, परंतु अखेर अहमदाबादची २०३० च्या खेळांच्या यजमानपदासाठी निवड झाली. अहमदाबादने अलिकडच्या काही महिन्यांत राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप, आशियाई जलचर अजिंक्यपद स्पर्धा आणि एएफसी अंडर-१७ आशियाई कप २०२६ फुटबॉल पात्रता स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. २०२९ चे जागतिक पोलिस आणि अग्निशमन खेळ देखील अहमदाबाद, गांधीनगर आणि एकता नगर येथे आयोजित केले जाणार आहे.