गौतम गंभीर(फोटो-सोशल मीडिया)
Ind vs Sa 2nd Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या गुवाहाटी कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा ४०८ धावांनी पराभव केला. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ असा विजय मिळवला. गुवाहटी कसोटीतील ४०८ धावांनी झालेला पराभव भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा कसोटी पराभव ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर विजयासाठी ५४९ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते, परंतु भारतीय संघ १४० धावांतच गारद झाला. या पराभवानंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर पत्रकार परिषदेत सामोरा गेला.
हेही वाचा : क्रीडा जगतात शोककळा! बास्केटबॉलचा खांब ठरला काळ; मैदानावरच राष्ट्रीय खेळाडूने सोडला जीव; Video Viral
२५ वर्षांत पहिल्यांदाच एखाद्या परदेशी संघाकडून भारतीय संघाला घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत पराभव स्वीकारावा लागला. न्यूझीलंडविरुद्धच्या मागील क्लीन स्वीपनंतर घरच्या मैदानावर भारताचा हा दुसराच व्हाईटवॉश ठरला आहे.
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर देखील भारतीय संघाच्या पराभवामुळे खूपच निराश झालेला दिसून आला. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत गंभीरने स्पष्ट केले की, संघाच्या खराब कामगिरीसाठी खेळाडू पूर्णपणे जबाबदार असू शकत नाहीत. गंभीर म्हणाला की, “माझे भविष्य बीसीसीआय ठरवणार आहे. इंग्लंडमधील विजय आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसारखे यश देखील माझ्याशी जोडलेले आहे. पण आजचा पराभव ही प्रत्येकाची जबाबदारी असून त्याची सुरुवात माझ्यापासून होते.”
गंभीरकडून ही देखील मान्य करण्यात आले आहे की, ९५/१ वरून १२२/७ पर्यंत जाणे कोणत्याही संघासाठी अस्वीकार्य आहे. कोणत्याही वैयक्तिक खेळाडूला किंवा शॉट सिलेक्शनला दोष न देता, तो म्हणाला की ही एक सामूहिक चूक असून संघाने एकत्रितपणे चांगले खेळण्याची आवश्यकता आहे.
गौतम गंभीरने जुलै २०२४ मध्ये भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपदाचा सवकार केला होता. त्यांच्या कार्यकाळात भारताने एकूण १८ कसोटी सामने खेळले असून त्यापैकी १० सामने भारताला गमवावे लागले आहेत. या आकडेवारीवरून ही स्पष्ट होते की, गेल्या काही महिन्यांत संघाची कसोटी कामगिरी सातत्याने घसरत जात असल्याचे दिसत आहे.
अनेक क्रिकेट तज्ज्ञ असे म्हणतात की, विशेषज्ञ फलंदाज आणि गोलंदाजांऐवजी अष्टपैलू खेळाडूंवर संघाचे अधिक अवलंबित्व हे संघाच्या पराभवाचे एक प्रमुख कारण आहे. या निवड धोरणामुळे कोच गौतम गंभीरवर देखील टीका होत आहे.






