Chinnaswamy Stadium Stampede: Big update on Bengaluru stampede case; Top KCA officials resign
Chinnaswamy Stadium Stampede : १७ वर्षांनंतर आरसीबी संघाने पहिल्यांदा आयपीएल २०२५ ट्रॉफी जिंकल्यानंतर आरसीबी चाहत्यांचा उत्साह वाढला होता, त्यानंतर त्यांनी देशभर जल्लोष केला. आरसीबीच्या विजयोत्सवादरम्यान 4 जून रोजी चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या घटनेत ११ जणांना जीव गमवावा लागला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. या प्रकरणी आरसीबी व्यवस्थापन आणि कर्नाटक क्रिकेट असोसिएशन(केसीए)विरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यानंतर कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे सचिव ए शंकर आणि कोषाध्यक्ष ई जयराम यांनी शुक्रवारी (६ जून) रात्री आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे.
शनिवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका प्रेस निवेदनात अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते अपघाताची ‘नैतिक जबाबदारी’ घेत आहेत. या प्रकरणात त्यांची भूमिका खूपच मर्यादित अशीच होती. या घटनेनंतर मोठी कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणी अनेक राजकारणी आणि पोलिस अधिकाऱ्यांना आधीच निलंबित करण्यात आले आहे. आरसीबी, केएससीएचे अध्यक्ष रघुराम भट आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी डीएनए एंटरटेनमेंटविरुद्ध क्यूबन पार्क पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : French Open 2025 : ‘हा माझा शेवटचा सामना..’, पराभव लागला जिव्हारी, Novak Djokovic चे निवृत्तीचे संकेत..
राजीनामा देत वेळे अधिकारी म्हणाले की, दोन दिवसांत घडलेल्या अनपेक्षित आणि दुःखद घटनांमध्ये आमची भूमिका खूपच मर्यादित भूमिका असू शकते, परंतु याची आम्ही नैतिक जबाबदारी घेत आमच्या पदांचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच टे पुढे म्हणाले की, आम्ही ६ जून २०२५ रोजी कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांना पत्र पाठवले असून सचिव आणि कोषाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.
पीटीआयचा अहवाल आल्यानंतर काही तासांतच त्यांनी राजीनामा दिला. त्या अहवालात असे सांगण्यात आले होते की केएससीएने आरसीबीच्या आयपीएल विजयी उत्सव आयोजित करण्यासाठी विधान सौधा येथे परवानगी मागण्यात आली होती. यामुळे ही गोष्ट स्पष्ट झाली आहे की, केएससीएनेच फ्रँचायझीला कार्यक्रमासाठी मान्यता मिळवून देण्यास मदत केली होती.
हेही वाचा : पंत आणि अय्यर तर उगाच बदनाम! या खेळाडूला 3 ओव्हरसाठी दिले 10.75 कोटी
केएससीएने असे देखील म्हटले होते की, कार्यक्रमाची जबाबदारी संबंधित कार्यक्रम कंपनीची असणार आहे, जी सर्व आवश्यक व्यवस्था करेल. त्यानंतर रघुराम भट, शंकर आणि जयराम यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला तेव्हा त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात सांगितले की गेट आणि गर्दी व्यवस्थापन ही असोसिएशनची जबाबदारी नाही.
विधान सौधा येथे आयोजित करण्यात आलेला सत्कार समारंभ व्यवस्थित पार पडला. परंतु, पण दुसरीकडे, चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर खूप गोंधळ उडला, लाखो लोक तिथे उपस्थित होते. या गर्दीमुळे विजय मिरवणूक थांबवण्यात आली होती. तथापि, स्टेडियममधील कार्यक्रम मात्र सुरूच राहिला. त्यामुळे लोकांच्या नाराजीत वाढ झाली. या प्रकरणात, न्यायालयाने आता पोलिसांना कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांविरुद्ध कोणतीही कठोर कारवाई करण्यात येऊ नये असे सांगण्यात आले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ जून रोजी होणार आहे.