फोटो सौजन्य -Delhi Capitals
IPL 2025 : आयपीएल 2025 चा हंगाम आता संपला आहे, या सीझनमध्ये रॉयल चॅलेंजेस बंगळुरू म्हणजेच आरसीबी यांनी जेतेपद जिंकले. आयपीएलचा इतिहासामध्ये ऋषभ पंत हा सर्वात महागडा खेळाडू ठरला विषय पण त्याला लखनऊ सुपर जायंट्स ने 27 कोटींना विकत घेतले. पण या सिझनमध्ये त्याची काही विशेष कामगिरी राहिली नाही त्यामुळे त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते.
रिषभ पंतने सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये तर 20 चा आकडा देखील पार केला नव्हता या सीजनमध्ये त्याने शेवटचे सामन्यांमध्ये शतक झळकावले तर त्या आधी फक्त एक अर्धशतक केले होते. श्रेयस अय्यरला पंजाब किंग्सने या सीजनमध्ये मेगा ऑक्सनमध्ये विकत घेतले. श्रेयस अय्यर याला 26.75 कोटींना पंजाब किंग्सने विकत घेतले आणि संघाचा कर्णधार बनवले. त्याने या सीझनमध्ये पंजाब किंग्सच्या संघाला फायनल पर्यंत नेले पाण्याची सामन्यात त्यांना आरसीबीच्या संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता पण या सीजनमध्ये पंजाब संघाने कमालीची कामगिरी केली आहे.
मेगा ऑक्शनमध्ये अनेक खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात पैशांची उधळण करण्यात आली. आता असाच एक खेळाडू आहे ज्याने फक्त आयपीएल 2025 च्या सीजन मध्ये तीन ओव्हर टाकले आणि त्याला फ्रॅंचाईजीने दहा कोटी ने विकत घेतले होते.
IND vs ENG : इंग्लड दौऱ्यावर कसोटी क्रिकेटमध्ये कोण घेणार रोहित शर्माची जागा? समोर आली तीन नावं
तथापि, असा एक गोलंदाज आहे ज्याला ३ षटके टाकण्यासाठी १० कोटी ७५ लाख रुपये मिळाले. खरंतर, हा गोलंदाज दुसरा तिसरा कोणी नसून टी नटराजन आहे, ज्याला आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सने १०.७५ कोटी रुपयांना खरेदी केले होते, परंतु या गोलंदाजाला फक्त दोन सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. यापैकी एका सामन्यात त्याला गोलंदाजी करण्याची गरज नव्हती कारण तो सामना पावसामुळे वाया गेला होता.
दिल्ली कॅपिटलच्या संघाने त्याला एका सामन्यात संधी दिली होती यावेळी त्याने एका सामन्यांमध्ये गोलंदाजी केली आणि त्यामध्ये त्यांनी चार षटकांच्या कोट्यातून फक्त तीन ओव्हर्स टाकल्या आणि यामध्ये त्याने 49 धावा दिल्या होत्या. त्याला एकही विकेट मिळाली नाही. अशाप्रकारे, हा गोलंदाज दिल्ली कॅपिटल्ससाठी सर्वात महागडा ठरला. तथापि, आयपीएलचे नियम सांगतात की लीग टप्प्यात तुम्ही १०० टक्के सामने खेळता तितकेच पैसे तुम्हाला मिळतात.