नोवाक जोकोविच(फोटो-सोशल मीडिया)
French Open 2025 : फ्रेंच ओपन २०२५ मध्ये दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविचचा प्रवास संपुष्टात आला आहे. जगातील नंबर वन खेळाडू यानिक सिनरने नोवाक जोकोविचचा पराभव करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यानिक सिनरने जोकोविचला सलग तीन सेटमध्ये ६-४, ७-५, ७-६ असे हरवून अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामन्यात सिनरचा गतविजेत्या अल्काराझचे आव्हान असणार आहे. जोकोविचने परभवानंतर भावना व्यक्त केल्या.
सिनेरने हा सामना जिंकून पहिल्यांदाच फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. तथापि, या खेळादरम्यान त्याने एकही सेट गमावला नाही. अंतिम सामना अल्काराझविरुद्ध असणार आहे. ज्याने गेल्या चार सामन्यांमध्ये सलग सिनरला हरवले आहे. अल्काराझ सिनेरपेक्षा ७-४ ने पुढे आहे. हा अंतिम सामना जिंकून सिनर त्याचा चौथा ग्रँड स्लॅम जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच वेळी, अल्काराझ त्याच्या पाचव्या ग्रँड स्लॅमवर पटकावण्याचे लक्ष ठेवून आहे.
हेही वाचा : “भारत तुम चले चलो” भारत विरुद्ध इंग्लड मालिकेसाठी Sony Sports Network चा खास व्हिडीओ!
सिनरनचा धमाका..
सिनर शुक्रवारी बोलला की, ‘स्वतःसाठी सर्वोत्तम संधी निर्माण करतो आणि आता मला हे व्यासपीठ मिळाले आहे. सध्या माझ्यासाठी यापेक्षा कोणती मोठी संधी असू शकणार नाही. मी मानसिकदृष्ट्या तिथेच राहण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येक गुण जिंकण्यासाठी कोणतीही कमी सोडली नाही. फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचणारा सिनर हा दुसरा इटालियन पुरुष खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी १९७६ चा चॅम्पियन अॅड्रियानो पनाट्टा अंतिम फेरीत दाखल झाला होता.
जोकोविच हा पुरुषांचा विक्रम २४ वेळा ग्रँड स्लॅम विजेता राहिलेला आहे, परंतु तो कोर्ट फिलिप चॅटियरवर सिनरच्या अचूक आणि वेगवान फोरहँडची बरोबरी करणायात कमी पडला. या पराभवानंतर नोवाक जोकोविच म्हणाला की हा सामना त्याचा शेवटचा सामना असू शकतो, असे विधान केले आहे.
सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत नोवाक जोकोविच थोडा भावुक दिसून आला. तो म्हणाला की “आजचा सामना माझ्या कारकिर्दीतील शेवटचा सामना असू शकतो, जो मी येथे खेळलो आहे. म्हणूनच शेवटच्या क्षणी माझ्या भावना थोड्या जास्तच ओसंडून वाहत आहेत.”
हेही वाचा : Ind vs Eng : भारतीय संघाने Tendulkar-Anderson Trophy साठी इंग्लंडभूमीवर ठेवले पाऊल; BCCI कडून Video शेअर..
जोकोविच पुढे म्हणाला की, “जर हा माझा शेवटचा रोलँड गॅरोस सामना असेल तर मी म्हणेन की तो खेळण्याचा अनुभव खूप छान होता. येथील ऊर्जा, प्रेक्षकांचा प्रेम आणि वातावरण यामुळे ते विशेष बनले आहे. मला पुन्हा येथे मैदानावर उतरायचे आहे, परंतु सध्या मला सांगता येणार नाही की, १२ महिन्यांनंतर मी पुन्हा खेळू शकेन की नाही.