बर्मिंगहॅममध्ये एका रंगारंग कार्यक्रमानं राष्ट्रकुल स्पर्धेला (CommonWealth Games 2022)सुरुवात झाली. 30 हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत भव्य उद्घाटन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यात बर्मिंगहॅम देशाचा गौरवशाली इतिहास दाखवण्यात आला. नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसफाई हिनं सर्व खेळाडूंचं खेळात स्वागत केलं. मलालानं शिक्षण आणि शांतीचा संदेश दिला. इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये (England) 8 ऑगस्टपर्यंत पार पडणाऱ्या स्पर्धेत भारताचे 108 पुरुष आणि 107 महिला खेळाडू विविध अशा 15 खेळांमध्ये सहभागी होतील.या उद्घाटन सोहळ्यात भारतीय संघाच्या प्रवेशानं संपूर्ण स्टेडियम दुमदुमून गेला. बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू आणि हॉकी कर्णधार मनप्रीत सिंग यांनी संघाचं नेतृत्व केलं.
कॉमनवेल्थ गेम्संचा (CommonWealth Games 2022) ओपनिंग सेरेमनी पार पडल्यानंतर आजपासून (29 जुलै) खेळांना सुरुवात होत आहे.
Commonwealth Games 2022 officially declared open
Read @ANI Story | https://t.co/bHEGk7MdwD#Commonwealth #CWG22 #Birmingham2022 pic.twitter.com/vkVDzop6Ha
— ANI Digital (@ani_digital) July 28, 2022