फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे सामने सुरु आहेत. यामध्ये आता आतापर्यत दोन्ही संघामध्ये तीन सामने झाले आहेत. मालिकेमध्ये सध्या १-१ अशी बरोबरी आहे यामध्ये एक सामना ड्रॉ झाला आहे. या मालिकेमध्ये पाच सामने होणार आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघासाठी या मालिकेमध्ये विजय मिळवणं गरजेचे आहेत. पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने 295 धावांनी विजय मिळवत शानदार सुरुवात केली, मात्र, ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन करत मालिकेत बरोबरी साधली. तिसरा सामना ब्रिस्बेनमधील गाबा येथे खेळला गेला, जो पावसामुळे अनिर्णित राहिला.
PKL 11 : तमिळ थलाईवाजचा गुणांचे अर्धशतक गाठत मोठा विक्रम; बंगाल वॉरियर्सवर मिळवला दणदणीत विजय
तीन सामन्यांनंतर ही मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. आता या मालिकेतील उर्वरित दोन सामने मेलबर्न आणि सिडनी येथे होणार आहेत. या मोठ्या मालिकेतील खेळाडूंच्या कामगिरीवर चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. आता बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२४ मध्ये आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स कोणी घेतल्या आहेत. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या टॉप-५ यादीत दोन भारतीय आणि तीन ऑस्ट्रेलियन गोलंदाज आहेत. दोन भारतीयांमध्ये एक नाव जसप्रीत बुमराह आहे यात शंका नाही. बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकटाच लढताना दिसत आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे या मालिकेत बुमराहची कामगिरी यजमान देशाच्या गोलंदाजांपेक्षा खूपच सरस ठरली आहे.
बुमराहने आतापर्यंत खेळलेल्या ३ सामन्यांमध्ये केवळ १०.९० च्या सरासरीने सर्वाधिक 21 विकेट घेतल्या आहेत. होय, बुमराहशिवाय या मालिकेत आतापर्यंत कोणीही २० बळींचा आकडा गाठलेला नाही. या यादीत ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क १४ विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. बुमराह आणि स्टार्कमध्ये ७ विकेट्सचा फरक आहे. स्टार्कने २२.८६ च्या सरासरीने हे १४ विकेट घेतल्या आहेत. स्टार्कची सरासरी पाहता बुमराह कोणत्या स्तरावर गोलंदाजी करतो हे कळते.
ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत तर मोहम्मद सिराज आणि जोश हेझलवूड अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. सिराजचे टॉप-५ मध्ये येणे ही मोठी गोष्ट आहे. त्याने अद्याप मालिकेत त्याच्याकडून अपेक्षित प्रभाव दाखवला नाही, परंतु तरीही त्याने मालिकेत आतापर्यंत २३.९२ च्या सरासरीने १३ बळी घेतले आहेत, जे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स (२४.००) पेक्षा चांगले आहे.
जसप्रीत बुमराह – २१
मिचेल स्टार्क- १४
पॅट कमिन्स- १४
मोहम्मद सिराज- १३
जोश हेझलवूड- ६