ब्राझील- जगभरातून दु:खद बातमी समोर येत आहे. जगात सर्वांत लोकप्रिय असलेला खेळ म्हणजे फुटबॉल, आणि या खेळातील महान फुटबॉलपटू ब्राझीलचे पेले यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. जगभरातील महान व प्रसिद्ध खेळाडू आहेत, त्यामध्ये पेले यांचा आवर्जून उल्लेख होतोय. ब्राझीलला ३ वेळा फुटबॉल विश्वचषक जिंकून देणारे महान फुटबॉलपटू पेले यांचे ८२ व्या वर्षी गुरुवारी मध्यरात्री निधन झाले. ते कर्करोगाने आजारी होते. त्यांच्या निधनाची वार्ता त्यांची कन्या यांनी दिली आहे. पेले यांची कन्या यांनी निधनाची अधिकृत बातमी दिली आहे. त्यामुळं पेले यांच्या चाहत्यावर तसेच जगभरातील फूटबॉलप्रेमीवर शोककळा पसरली आहे.
[read_also content=”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे निधन; वयाच्या १०० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास https://www.navarashtra.com/india/prime-minister-narendra-modi-mother-hiraben-modi-passes-away-357946.html”]
पेले यांची कन्या म्हणाल्या की, ‘बाबा, आमचे अस्तित्वच तुमच्यामुळे आहे. तुमच्यावर कायम प्रेम असेल.’ पेलेंनी ४ वर्ल्डकप खेळले, पैकी ३ जिंकले. १९७१ मध्ये ब्राझील राष्ट्रीय संघातून निवृत्ती पत्करणाऱ्या पेलेंची कारकीर्द २१ वर्षांची होती. पेलेंना श्रद्धांजली वाहताना ब्राझीलचा नेमार म्हणाला, ‘पेलेंच्या आधी १० हा फक्त एक क्रमांक होता. त्यांनी त्याला कलेत बदलले, असं म्हटलंय तर जगभरातून अनेक खेळाडू तसेच दिग्गजांनी पेले यांना श्रद्धाजंली वाहिली आहे.
पेले यांचा प्रवास…
पेले यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1940 रोजी, तर मृत्यू 29 डिसेंबर 2022 रोजी झाला. पेले ९ वर्षांचे असताना त्यांनी वडिलांना रेडिओवर कॉमेंट्री ऐेकताना बघितले. ब्राझील पराभूत झाल्याने वडील रडायला लागले. त्यांचे अश्रू पुसत पेले म्हणाले, रडू नका, मीही वर्ल्डकप जिंकेन. बालपणी आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने ते सॉक्समध्ये कागद भरून त्याचा बॉल बनवून खेळायचे. त्यांनी वेटरचेही काम केले होते. पण नंतर पेले यांनी तीन वेळा आपल्या देशाला विश्वचषक जिंकून दिला होता. आजही पेले यांचे विक्रम अबाधित आहेत.
पेले यांचे जागतिक विक्रम