Buchi Babu Competition: Sarfaraz Express Susat! BCCI given a century warning..
Buchi Babu Competition : देशांतर्गत बुच्ची बाबू स्पर्धेचा थरार सूरु आहे. या स्पर्धेत अनेक भारतीय खेळाडू आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष्य वेधून घेत आहेत. यामध्ये नंबर एकवर आहे तो म्हणजे मुंबईकडून खेळणारा सरफराज खान हा खेळाडू. या स्पर्धेत सरफराज खान चांगल्या लयीत दिसत आहे. त्याने या स्पर्धेतील दुसरे शतक झळकवले आहे. त्याने आपल्या शतकाने भारतीय संघाचा पुन्हा एकदा दरवाजा ठोठावला आहे. त्याने 100 चेंडूत शनदार शतक झळकवले आहे.
सरफराज खानने हरियाणाविरुद्धच्या सामन्यात समोर येईल त्या गोलंदाजाचा समाचार घेतला आहे. सरफराज खानने 100 चेंडूत शतक लगावले. त्याने 112 चेंडूत 111 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. त्याने या दरम्यान 9 चौकार आणि पाच षटकारांची आतिषबाजी केली. त्याने केलेल्या खेळीने मुंबई संघाला मजबूत स्थितीत आणून ठेवले. मुंबईची स्थिती 4 बाद 84 अशी बिकट असताना मधल्या फळीतील सरफराज खानने शतक ठोकून संघाला स्थिरता मिळवून दिली. सरफराज खानने यापूर्वी टीएनसीए इलेव्हनविरुद्ध खेळताना 138 धावांची नाबाद खेळी साकारली होती.
सरफराज खानने पाचव्या विकेटसाठी हार्दिक तामोरेसोबत पाचव्या विकेटसाठी 117 धावांची भागीदारी रचली. दोघांनि मिळून हरियाणाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या दोघांच्या भागीदारीमुळे मुंबई संघ संकटातून बाहेर पडू शकला. हार्दिक तामोरेने 39 धावा केल्या.
सरफराज खानने झळकवलेल्या शतकाने त्याने पुन्हा एकदा बीसीसीआयला कडक इशारा दिला असल्याचे बोलले जात आहे. ऑक्टोबर महिन्यात आशिया कप स्पर्धेनंतर भारतात वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 च्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची असणार आहे. अशा स्थितीत भारतीय संघातील करूण नायरची जागा संकटात असल्याचे दिसत आहे. त्याच्या जागी संघात सरफराज खानला संधी मिळण्याची शक्यता अस्लयची चर्चा होऊ लागली आहे.
मागील वर्षी इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. त्यावेळी सरफराज खानने या मालिकेतून कसोटी पदार्पण केलं होतं. त्याने आपल्या या मालिकेत जबरदस्त खेळी करून चाहत्यांची मनं जिंकली होती. पण इंग्लंड दौऱ्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याला संघात स्थान देण्यात आले नव्हते. आता पुन्हा एकदा बुच्ची बाबू स्पर्धेत शतक ठोकून बीसीसीआयचे लक्ष वेधून घेतलं आहे. मुंबईने बुच्ची बाबू स्पर्धेत दोन सामने खेळले आहेत. यामधील एका सामन्यात सामन्यात पराभव, तर एक सामना ड्रॉ झाला आहे. मुंबईचा संघ या स्पर्धेतील सी गटात असून त्यामध्ये सर्वात खालच्या स्थानावर विराजमान आहे.
हेही वाचा : टॉप टेन टी-२० गोलंदाजांच्या यादीत भारताचे नाव नाहीच..! आकडेवारीने स्पष्ट केले ‘हे’ कारण