गौतम गंभीर(फोटो-सोशल मीडिया)
Asia cup 2025 : आशिया कप 2025 स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरवात होणार आहे. ही स्पर्धा यावेळी टी 20 स्वरूपात खेळवली जाणार आहे. या स्पर्धेला अवघे दिवस बाकी आहेत. भारत 10 सप्टेंबरला युएइविरुद्ध पहिला सामना खेळून आपल्या मोहिमेला सुरवात करणार आहे. त्यानंतर 14 ऑगस्टला भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये मोठी लढत बघायला मिळणार आहे. भारत पाकिस्तान यांच्यातील सामना होईल की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केल्याने हा सामना होणार असल्याचे समजते. याबाबत आता माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीने भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर निशाणा साधला आहे.
तिवारीने म्हटले आहे की, गौतम गंभीर जेव्हा भारतीय संघाचा प्रशिक्षक नव्हता तेव्हा त्याचे भारत-पाकिस्तान यांच्या सामन्याबाबत फार वेगळी मतं असायची. मात्र आता मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर गंभीर मूग गिळून गप्प बसला आहे, असं माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी गंभीरवर निशाणा साधत म्हटले आहे. भारत पाकिस्तान यांच्यात सामना होणार असल्याने मनोज तिवारीकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे.
हेही वाचा : ‘भारतीय संघासाठी त्याची गरज नाही..’, माजी खेळाडूचा विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेट निवृत्तीबाबत खळबळजनक खुलासा
मनोज तिवारीने भारत पाकिस्तान सामन्याबाबत आपला संताप व्यक्त करताना म्हटले आहे की, “पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानकडून निर्दोष भारतीयांची हत्या करण्यात आली. आता आम्हाला शत्रू राष्ट्रासोबत क्रिकेट खेळाव लागणार आहे. हे चुकीचं आहे.”
मनोज तिवारीने क्रिकट्रॅकरशी बोलताना म्हटले की, “मला कायम असं वाटत आल आहे की, तो दोन्ही बाजूने बोलत असतो. तो ढोंगी आहे. कारण ही तीच व्यक्ती आहेत जी कोच नसताना म्हणत असे की, भारत-पाकिस्तान सामना व्हायला नको. आता तो काय करणार आहे? आता भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. भारतीय संघ आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. आता तो राजीनामा का देत नाही?भारतीय संघासोबत असणार नाही. असे का सांगत नाही?” असे मत तिवारीने व्यक्त केले आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी गौतम गंभीर एका कार्यक्रमात म्हटला होता की, “भारताने पाकिस्तानविरुद्ध आयसीसी स्पर्धेत देखील खेळू नये. पाकिस्तान जोपर्यंत त्याच्या दहशतवादी कारवाया बंद करत नाही तोपर्यंत असेच करायला हवे.” यानंतर देखील भारत पाकिस्तान सामना पार पडला होता.
हेही वाचा : टॉप टेन टी-२० गोलंदाजांच्या यादीत भारताचे नाव नाहीच..! आकडेवारीने स्पष्ट केले ‘हे’ कारण