Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ते’ दोन चेंडू आणि इतिहासाला कलाटणी! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पूर्वी कधी न घडलेले घडले; वाचा सविस्तर 

आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक लीग २ च्या  कॅनडा आणि स्कॉटलंड यांच्यातील सामन्यात कॅनडाचे दोन सलामीवीर पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत. अशी घटना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदा घडली आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 01, 2025 | 09:35 PM
'Those' two balls and history was changed! Something that had never happened before in international cricket happened; Read in detail

'Those' two balls and history was changed! Something that had never happened before in international cricket happened; Read in detail

Follow Us
Close
Follow Us:

Canada vs Scotland : आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक लीग २ चे सामने सुरू आहेत. या स्पर्धेतील ८१ वा सामना  कॅनडा आणि स्कॉटलंड यांच्यात खेळवला गेला.  हा सामना किंग सिटीमधील मेपल लीफ नॉर्थ-वेस्ट ग्राउंडवर खेळवण्यात आला आहे. जिथे स्कॉटलंडने कॅनडाचा ७ विकेट्सने दणदणीत पराभव केला आहे. दोन्ही संघांमध्ये झालेल्या या सामन्यात आजवर कधी न घडलेली अशी घटना घडली आहे. स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून  प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर कॅनडाचा संघ प्रथम फलंदाजी साठी उतरला. यावेळी कॅनडाच्या संघासोबत डावाच्या पहिल्या दोन चेंडूंवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात कधी घडले नाही असे काही घडल्याचे पाहण्यात आले.

हेही वाचा : CPL 2025 मध्ये Tim Seifert चे वादळ घोंघावले! झळकवले सर्वात जलद शतक; केला ‘हा’ पराक्रम

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घडला हा अनोखा प्रकार

खरं तर, नाणेफेक गमावल्यानंतर आणि प्रथम फलंदाजी केल्यानंतर, कॅनडाच्या संघाच्या पहिल्या दोन चेंडूंवर दोन्ही सलामीवीरांना माघारी  जावे लागले.  जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात आजतागायत कधीच घडले नव्हते. डावाच्या पहिल्या दोन चेंडूंवर दोन गेल्याच्या घटना  क्रिकेटमध्ये खूप वेळा घडल्या आहेत. परंतु दोन्ही सलामीवीर पहिल्या दोन चेंडूवर बाद होण्याची ही पहिलीच घटना आहे. ही घटना ब्रॅड करीच्या पहिल्याच षटकात अनुभवायला मिळाली आहे.

सामना सुरू झाल्यावर सामन्याच्या पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ब्रॅड करीने कॅनडाचा सलामीवीर अली नदीमला माघारी पाठवले. त्यानंतर परगत सिंग फलंदाजीसाठी मैदानात आला. त्याच वेळी दुसरा सलामीवीर युवराज समरा नॉन-स्ट्राइकवर उभा असताना तो सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर धावबाद झाला. त्यामुळे त्यालाही माघारी जावे लागले. त्यामुळे कॅनडाला पहिल्या दोन चेंडूंवर आपले दोन्ही सलामीवीर गमवावे लागले. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा :‘दोघांच्या जवळपासही कुणी नाही..’ ‘RO-KO’ च्या निवृत्तीवर फिरकीपटू रवी बिश्नोईची नाजुक साद

स्कॉटलंडकडून कॅनडाचा पराभव

या सामन्यात कॅनडाच्या डावावर सुरुवातीपासूनच दबाव असल्याचे जाणवत होते. त्यांचे दोन्ही सलामीवीर हे पहिल्या दोन चेंडूवर बाद झाले. त्यामुळे हा दबाव जास्तच दिसून येऊ लागला होता. स्कॉटलंडचा वेगवान गोलंदाज ब्रॅड करीने शानदार गोलंदाजी करत ३ विकेट्स घेतल्या, ज्यामुळे कॅनडाच्या संघाने ११ षटकांत फक्त १८ धावांत त्यांच्या ५ विकेट्स गमावल्या होत्या. तथापि, श्रेयस मोव्ह्वाने संघाला सामन्यात परत आणण्याचा प्रयत्न करताना त्याने ६० धावांची खेळी साकारली. ज्यामुळे कॅनडाचा संघ ४८.१ षटकांत १८४ धावांपर्यंत  मज मारण्यास यशस्वी झाला. स्कॉटलंडकडून ब्रॅड करीने सर्वाधिक ४ बळी घेतले.  दुसरीकडे, स्कॉटलंडने हे लक्ष्य ४१.५ षटकांत ३ गडी गमावून सहज गाठले आणि विजय मिळवला.

Web Title: Canadas openers fall on first two balls against scotland

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2025 | 09:35 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.