विराट कोहली आणि रोहित शर्मा (फोटो-सोशल मीडिया)
Ravi Bishnoi’s commentary on Rohit and Virat’s retirement : रोहित शर्मा आणि विराट कोहली या भारतीय संघाच्या दिग्गज अनुभवी जोडीने टी २० आणि कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिल होता. या दोघांचा हा निर्णय कुणालाच रुचला नव्हता. यावर अनेक क्रिकेतप्रेमी, चाहते यांच्याकरून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. रोहित आणि विराट या दोघा खेळाडूंनी आपल्या कामगीरीच्या आणि अनुभवाच्या जोरावर भारताला 2024 साली वर्ल्ड कप जिंकून देण्यात मोठी कामगिरी बजावली आणि त्यानंतर या दोघांनी टी 20 क्रिकेटला रामराम ठोकला. त्यानंतर जून महिन्यातया दोघांकडून कसोटी क्रिकेटला देखील अलविदा म्हटले. या दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीबाबत भारतीय युवा फिरकीपटू रवी बिश्नोईने आपले मत व्यक्त करताना म्हटले की, बीसीसीआयने या दोन दिग्गजांना सन्मानाने निरोप द्यायला पाहिजे होता.
हेही वाचा : CPL 2025 मध्ये Tim Seifert चे वादळ घोंघावले! झळकवले सर्वात जलद शतक; केला ‘हा’ पराक्रम
रवी बिश्नोईने विराट आणि कोहली यांच्या निवृत्तीबाबत प्रतिक्रिया दिली. रवी म्हणाला की, “विराट आणि रोहितने निवृत्त होणं हे एखाद्या धक्क्यासारखं होतं. अनेकांची या दोघांना मैदानातून निवृत्त होताना बघायची इच्छा होती. हे दोघेही मोठे दिग्गज खेळाडू आहेत. ते मैदानातून निवृत्त झाले असते तर जास्त चांगलं ठरलं असतं. या दोघांनी भारतासाठी खूप काही दिलं आहे. माझ्या नजरेत त्या दोघांच्या जवळपास कुणी देखील नाही”, असे मत रवी बिश्नोईने एका पॉडकास्टमध्ये मांडलं आहे.
रवी बिश्नोईने पुढे म्हटले आहे की, “रोहित आणि विराट यांना चांगल्या पद्धतीने निरोप देण्यात यावा असे अपेक्षित आहे. या दोघांना वनडे क्रिकेटमधून हा निरोप दिला जाण्याची शक्यता आहे. त्यांना वाटेल तेव्हा ते निवृत्त होऊ शकतात. त्यांना निवृत्तीसाठी कुणी काही सांगू शकत नाही. त्यांचं कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणं माझ्यासाठी खूप धक्कादायक असे होते. त्यांची जागा आता कोण घेईल हे माहित नाही.”
हेही वाचा : अॅशेस मालिकेपूर्वी इंग्लंडला मोठा हादरा! भारताविरुद्ध स्टार ठरलेल्या खेळाडूचा अचानक कसोटी क्रिकेटला ब्रेक
या दरम्यान भारतीय संघ आशिया कप 2025 स्पर्धेत खेळण्यासाठी तयार झाला आहे. ही स्पर्धा यूएईएमध्ये खेळवली जाणार आहे. या वेळआय अहिसया कप टी २० सकरूपट खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार असून भारतीय संघ 10 सप्टेंबरला यूएई विरुद्ध आपला पहिला सामना खेळून या मोहिमेला सुरवात करणार आहे.