IND Vs ENG: 'Jasprit Bumrah is available, but..', Captain Shubhman Gill's big statement about the 'Yorker King's' playing in the second Test..
IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. त्यातील लीड्स येथे खेळवण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात भारताला इंग्लंडकडून ५ विकेट्सने पराभव पत्करावा लागला आहे. या सामन्यात भारताकडून बऱ्याच चुका झाल्या आहेत. पराभवाचे खरे कारण म्हणजे ढिसाळ क्षेत्ररक्षण आणि कमकुवत गोलंदाजी. भारताकडून जसप्रीत बूमराहने पहिल्या डावात ५ विकेट्स मिळवल्या होत्या. नत्र मात्र दुसऱ्या डावात त्याला विकेट्स घेण्यात अपयश आले. टीम इंडिया मालिकेत ०-१ ने पिछाडीवर आहे. आता या मालिकेतील दूसरा सामना एजबॅस्टन येथे २ जुलैपासून खेळवला जाणार आहे. या सामान्यापूर्वी भारताचा कर्णधार शुभमन गिल याने वेगवान गोलंदाज जसप्रीत बूमराहच्या उपलब्धतेबाबत मोठी माहिती दिली आहे.
हेही वाचा : IND vs ENG : दुसऱ्या कसोटीत Rishabh Pant रचणार इतिहास! विराट कोहलीचा विक्रम धोक्यात..
दुसऱ्या कसोटी सामन्यातील जसप्रीत बुमराहच्या उपस्थितीबद्दल शुभमन गिल म्हणाला की, “जसप्रीत बुमराह उपलब्ध असून आम्ही २० विकेट्स घेऊ शकतो आणि धावा देखील करू शकतो. असा योग्य पैलू शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आज शेवटच्या वेळी विकेट्स बघून आम्ही अंतिम निर्णय घेणार आहोत.” जसप्रीत बुमराह फक्त तीन सामने खेळत असल्याबद्दलच्या चर्चेतबाबत कर्णधार शुभमन गिल म्हणाला “हे थोडे कठीण आहे पण आम्ही भारतातून सर्वोत्तम खेळाडू निवडलेले आहेत. हे अशक्य काम नाही, इतर गोलंदाज चांगले आहेत, आमच्याकडे चांगला पूल आहे” असे गिल म्हणाला.
बर्मिंगहॅम कसोटीत, टीम इंडिया पहिल्या सामन्यात अनेक चुका केल्या त्याचा फटका संघाला सामना गमावून बसलाया आहे. आता संघ त्याच चुका पुन्हा करू इच्छित नसल्याने पहिल्या कसोटीदरम्यान, टीम इंडियाने क्षेत्ररक्षणासोबतच खालच्या फलंदाजीच्या क्रमात अनेक चुका देखील केल्या आहेत. असे बोलले जात आहे की, दुसऱ्या कसोटी सामन्यात, टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याच वेळी, एजबॅस्टन कसोटीपूर्वी, टीम इंडियाचे गोलंदाज दोन रंगांच्या चेंडूने सराव करताना दिसून आले आहेत.
हेही वाचा : IND Vs ENG : इंग्लंड जाळ्यात अडकणार? एजबॅस्टन कसोटीत टीम इंडियाने आखली जोरदार रणनीती; पहा Video
लीड्समध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात, जसप्रीत बुमराह वगळता सर्व गोलंदाज अपयशी ठरलेले दिसले. यादरम्यान, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा सारखे खेळाडू त्यांच्या मूळ लयीत दिसले नाहीत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की भारतीय संघ आयपीएल २०२५ नंतर लगेचच इंग्लंडच्या दौऱ्यावर रवाना झाला होता. अशा परिस्थितीत, आयपीएल लाईन लेंथपासून मुक्त होण्यासाठी, टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दोन रंगांच्या चेंडूने सराव केला आहे.