Champions Trophy 2025 AFG vs AUS Match Afghanistan's Gave Target to Australia to 274 Runs Now Australia's Batting Examination will be tough
Champions Trophy 2025 AFG vs AUS Match : अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 273 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानने 274 धावांचे लक्ष्य दिले. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी अफगाणिस्तानला जखडून ठेवले. अफगाणिस्तानकडून सेदिकुल्लाह अटलने 95 चेंडूत 85 धावा केल्या. तर अझमुत्त्तुलाह ओमरझाईने शानदार फलंदाजी करीत 63 चेंडूत 67 धावा केल्या. यामध्ये आज सलामी जोडी रहमनुल्लाह गुरबाज आणि इब्राहिम झाद्रान कुठलाही प्रभाव पाडू शकले नाहीत. कर्णधार हशमुत्तुलाह शाहिदीने 49 चेंडूत 20 धावा केल्या तर राशीद खानने 19 धावांचे योगदान दिले.
सोदीकुल्लाह अटलच्या ८५ धावांच्या खेळीनंतर, अझमतुल्लाह उमरझाईने शेवटच्या षटकांमध्ये जलद गतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने ६३ चेंडूत ६७ धावा केल्या, या डावात त्याने ५ षटकार आणि १ चौकार मारला. अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. स्पेन्सर जॉन्सनने पहिल्याच षटकात रहमानुल्लाह गुरबाजला शून्यावर बाद केले होते. यानंतर, इब्राहिम झद्रान आणि सोदीकुल्लाह अटल यांनी डावाची सूत्रे हाती घेतली आणि तिसऱ्या विकेटसाठी ६७ धावांची महत्त्वाची भागीदारी केली. इब्राहिम झद्रान (२२) ला अॅडम झम्पाने पायचीत केले.
सोदीकुल्लाह अटलने ८५ धावांची महत्त्वाची खेळी खेळली
९१ धावसंख्येवर ग्लेन मॅक्सवेलने रहमत शाह जुरमेट (१२) च्या रूपात अफगाणिस्तानचा तिसरा बळी घेतला. यानंतर, सोदीकुल्लाह अटलने कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीसोबत ६८ धावांची भागीदारी केली. चौथी विकेट सोदीकुल्लाह अटलच्या रूपात पडली, त्याचे शतक हुकले. त्याने ९५ चेंडूत ८५ धावा केल्या. या खेळीत त्याने ३ षटकार आणि ६ चौकार मारले.
अझमतुल्लाह उमरझाईच्या स्फोटक खेळीच्या मदतीने अफगाणिस्तानच्या २७३ धावा
अफगाणिस्तानची ७वी विकेट १९९ धावांवर पडली. अफगाणिस्तान येथून फक्त ३०-४० धावाच जोडू शकेल असे वाटत होते पण अजमतुल्लाह उमरझाईने जलद खेळी करत संघाची धावसंख्या २७३ पर्यंत नेण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याने ६३ चेंडूत ६७ धावा केल्या आणि त्यात ५ षटकार आणि १ चौकार मारला.
स्पेन्सर जॉन्सन आणि अॅडम झांपा यांनी प्रत्येकी २-२ विकेट
डावखुरा वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉन्सनने १० षटकांच्या स्पेलमध्ये ४९ धावा देत २ बळी घेतले. अॅडम झम्पाने ८ षटकांत ४८ धावा देत २ बळी घेतले. या डावात बेन द्वारशुइसने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्याने ९ षटकांत ४७ धावा दिल्या. याशिवाय नाथन एलिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी १-१ विकेट घेतल्या.