चेन्नई : आयपीएलमध्ये (IPL 2023) शुक्रवारी झालेल्या सलामीच्या सामन्यात गतविजेत्या गुजरातने चेन्नईला (CSK) चीतपट केले होते. त्यानंतर सोमवारी चेन्नईशी गाठ लोकेश राहुलच्या लखनऊ (UP) संघाशी पडली. सोमवारी झालेल्या चेन्नई विरुद्ध लखनऊ सामन्यात चेन्नई आयपीएलमधील या हंगामात विजयी श्रीगणेशा केली आहे. चेन्नईनं लखनऊवर 12 धावांनी विजय मिळवत विजयाचे खाते उघडले आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या आयपीएल-16 च्या सहाव्या सामन्यात धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने लखनऊवर 12 धावांनी विजय मिळवला. चेन्नईने दिलेले 218 धावांचे आव्हान पार करताना लखनऊच्या संघाने 20 षटकांत 7 गडी गमावून 205 धावा केल्या. शनिवारी लोकेश राहुलच्या (Lokesh Rahul) नेतृत्वाखाली लखनऊ संघाने आपल्या घरच्या मैदानावर विजयी सलामी दिली. या संघाने दिल्ली कॅपिटल्सवर 50 धावांनी मात केली होती.
मराठमोळ्या ऋतुराजचे सलग दुसरे अर्धशतक…
दरम्यान, चेन्नईच्या पहिल्या सामन्यात महाराष्ट्रातील युवा खेळाडू ऋतुराज गायकवाडने तुफान फटकेबाजी करत अर्धशतक झळकावले. त्यानंतर आज पुन्हा एकदा त्याने फटकेबाजी करत सलग दुसरे अर्धशतक ठोकले. आयपीएलच्या 16 व्या हंगामातील पहिल्या सामन्यात ऋतुराज गायकवाड याने विस्फोटक फलंदाजी केली होती. गुजरातविरोधात ऋतुराजने 92 धावांचा पाऊस पाडला होता. त्यानंतर आज लखनौविरोधात त्याने 57 धावांची अर्धशतकी खेळी केली. या खेळीत ऋतुराज गायकवाड याने 4 षटकार आणि तीन चौकार लगावले. रवि बिश्नोईच्या गोलंदाजीवर ऋतुराजची खेळी संपुष्टात आली.
चेन्नई दोनशे पार…
चार वर्षांनंतर होम ग्राऊंड चेपॉकच्या मैदानावर चेन्नईने टॉस हरल्यानंतर फलंदाजी करताना 20 षटकांत 7 विकेट गमावून 217 धावा केल्या. संघाने IPL मध्ये 24 व्यांदा 200+ स्कोअर करण्याचा विक्रमही केला. प्रत्युत्तरात लखनऊचे बॅटर्स 20 षटकांत 7 विकेट वर 205 रनच करू शकले. मोईन अलीने अचूक गोलंदाजी केली. त्याने आधी लखनऊचा ओपनर व आक्रमक फलंदाज काईल मेयर्सला (53 ) आऊट करत मोठी भागीदारी मोडली. मेयर्स खेळत असताना, लखनऊ सहज विजय मिळवेल असं वाटत होतं. मात्र मेयर्सची विकेट पडताच एकापाठोपाठ एक-एक विकेट पडत गेल्या. लगेच त्यानंतरच्या षटकात केएल राहुल (20 रन) आणि कृणाल पंड्या (9 रन) आणि मार्कस स्टॉयनिस (21 रन) यांचीही विकेट घेतली. मात्र लखनऊ संघाने शेवच्या बॉलपर्यंत किल्ला लढवला. रवि बिश्नोईच्या गोलंदाजीवर ऋतुराजची खेळी संपुष्टात आली. त्यानं उत्तम गोलंदाजी करत तीन विकेट घेतल्या.