चेन्नई : आयपीएलमध्ये (IPL 2023) शुक्रवारी झालेल्या सलामीच्या सामन्यात गतविजेत्या गुजरातने चेन्नईला (CSK) चीतपट केले होते. त्यानंतर आज चेन्नईशी गाठ लोकेश राहुलच्या लखनऊ (UP) संघाशी होणार आहे. शनिवारी लोकेश राहुलच्या (Lokesh Rahul) नेतृत्वाखाली लखनऊ संघाने आपल्या घरच्या मैदानावर विजयी सलामी दिली. या संघाने दिल्ली कॅपिटल्सवर ५० धावांनी मात केली आहे. त्यामुळं लखनऊ संघाचा आत्मविश्वास नक्कीच दुणावला असणार, चार वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्ज चार वर्षांनंतर आपल्या घरच्या मैदानावर उतरणार आहे. त्यामुळं आज होणाऱ्या सामन्यात बाजी कोण मारणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मराठमोळ्या ऋतुराज, राजवर्धनच्या खेळीकडे लक्ष…
दरम्यान, चेन्नईच्या पहिल्या सामन्यात महाराष्ट्रातील युवा खेळाडू ऋतुराज गायकवाडने तुफान फटकेबाजी करत अर्धशतक झळकावले. हे दोघेही यंदाच्या आयपीएलमध्ये तुफानी फॉर्मात आहे. सलामीच्या सामन्यात पुण्याच्या ऋतुराजने आकर्षक अर्धशतक खेळी करताना, नजाकतभरे व डोळ्याचे पारणे फेडणारे फटके लगावले. तर दुसरीकडे धाराशिवच्या राजवर्धनने पदार्पणात तीन बळी घेतले. त्यामुळं या दोघांकडून अपेक्षा उंचावल्या आहेत.
चेन्नई आज विजयाचे खाते उघडणार
देशात २००८ पासून आयपीएलला सुरुवात झाली, तेव्हापासून आजपर्यंत चार वेळा चेन्नई सुपरकिंग्ज ही स्पर्धा जिंकली आहे. त्यामुळं चेन्नईच्या फन्सना विजयाची प्रतिक्षा आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सायंकाळी ७.३० वाजेपासून समोरासमोर असतील. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाची लीगची सुरुवात निराशाजनक झाली. टीमला सलामी सामन्यात शुक्रवारी गत चॅम्पियन गुजरात संघाने धूळ चारली. शुक्रवारपासून जगातील क्रिकेटच्या महाउत्सवाला सुरुवात झालेय. शुक्रवारी (३१ मार्च) जगातील सर्वांत मोठ्या क्रिकेटमधील आयपीएल (IPL 2023) लिगला सुरुवात झाली आहे. सलामीच्या लढतीत चेन्नई सुपर किंग्सने (CSK) निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 178 धावा केल्या. यामध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून ऋतुराज गायकवाड याने सर्वाधिक 92 धावांचं योगदान दिले. याला प्रतिउत्तर देताना, गुजरातने चेन्नईवर पाच गडी राखत विजय मिळवल. गुजरातने 19.2 ओव्हरमध्ये 5 बाद 182 धावा केल्या. त्यामुळं आज होणाऱ्या चेन्नई विरुद्ध लखनऊ सामन्यात बाजी कोण मारणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.