
फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये झालेल्या मालिकेत भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर याआधी टीम इंडिया श्रीलंकेविरुद्व झालेल्या एकदिवसीय मालिकेत सुद्धा पराभूत झाली होती. आता बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 टीम इंडियासाठी खूप महत्त्वाची असेल. या मालिकेत एकूण पाच कसोटी खेळल्या जाणार आहेत. टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी पाचपैकी चार टेस्ट जिंकाव्या लफणार आहेत. मात्र या मालिकेपूर्वी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी एक मोठा नियम मोडला आहे. चला तर मग जाणून घेऊयात काय नियम होता आणि नियम मोडल्याबद्दल गंभीरवर कारवाई होणार की नाही.
‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, गंभीरने संघाच्या निवड समितीत सामील होऊन मोठा नियम मोडला. वास्तविक, बीसीसीआयच्या नियमांनुसार, कोणताही प्रशिक्षक निवड समितीच्या बैठकीला उपस्थित राहू शकत नाही, परंतु गंभीर हा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी झालेल्या निवड बैठकीचा भाग होता. मात्र, बीसीसीआयने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु यासंदर्भात अनेक वृत्त समोर आले आहेत.
हेदेखील वाचा – सचिन तेंडुलकरच्या 5 कोटींचे झाले 72 कोटी! ‘या’ कंपनीने गुंतवणूकदारांना केले मालामाल!
भारतीय क्रिकेट संघाची बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी १८ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये अभिमन्यू ईश्वरन टीम इंडियासाठी पहिल्यांदा खेळणार आहे. त्याचबरोबर प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी या खेळाडूंना सुद्धा संघामध्ये स्थान मिळाले आहे. आता भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणाऱ्या मालिकेत टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. त्याचबरोबर भारताचा संघ लवकरच बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, आर जडेजा, आर. मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
राखीव- मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद.
हेदेखील वाचा – Gautam Gambhir : गौतम गंभीरचा पद धोक्यात! बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ठरवणार त्याचं भविष्य!
टीम इंडियाला नुकतेच न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 0-3 ने व्हाईट वॉशचा सामना करावा लागला होता. घरच्या भूमीवर तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाचा व्हाईटवॉश होण्याची ही पहिलीच वेळ होती. भारताच्या संघाची फलंदाजीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे आतापर्यंत गंभीरचे कोचिंग टीम इंडियासाठी काही खास राहिलेले नाही. गंभीरच्या कोचिंगमध्ये टीम इंडियाने पहिला श्रीलंका दौरा केला. या दौऱ्यावर टीम इंडियाने 27 वर्षांनंतर श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका गमावली.