चेन्नई: महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद रवींद्र जडेजाकडे सोपवले आहे. CSK किंग धोनी पहिल्यादाच नाॅर्मल खेळाडूच्या रुपात उतरणार आहे. धोनीच्या नावावर आतापर्यंत कर्णधारपदाचा विक्रम आहे. आयपीएल २०२२ मध्ये अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. या हंगामापूर्वीच अनुभवी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद रवींद्र जडेजाकडे सोपवले आहे. या मोसमातून आता जडेजा संघाची कमान सांभाळणार आहे. चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर याबाबतचे निवेदन जारी केले आहे. धोनीचा आयपीएलमधील कर्णधारपदाचा विक्रम पाहिला तर तो प्रभावी ठरला आहे.
धोनीने आयपीएल २००८ पासून आतापर्यंत संघाचे नेतृत्व केले आणि अनेक कठीण सामन्यांमध्ये चेन्नईला विजय मिळवून दिला. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने ४ वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. त्याच्यामुळेच चेन्नई आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ बनला आहे.
धोनीचा आयपीएलमधील कर्णधारपदाचा विक्रम बघितला तर तो खूप चांगला राहिला आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्ज तसेच पुणे सुपरजायंट्सचे नेतृत्व केले. धोनीने कर्णधार म्हणून २०४ सामने खेळले आणि या काळात त्याने १२१ सामने जिंकले. यासह त्याला ८२ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. धोनीच्या नेतृत्वाखाली संघाची विजयाची टक्केवारी ५९.६० इतकी आहे.
विशेष म्हणजे धोनीच्या नेतृत्वाखाली हा संघ आठ वेळा आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. ११ वेळा प्लेऑफमध्ये पोहोचला आहे.