Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Clutch Chess : D. Gukesh ने ‘माज’ उतरवला! सायलेंट खेळीने ‘किंग’ भिरकवणाऱ्या Hikaru Nakamura ला पाजले पाणी; वाचा सविस्तर 

डी. गुकेशने सेंट लुईस, मिसूरी, यूएसए येथे झालेल्या क्लच चेस: चॅम्पियन्स शोडाऊनच्या पहिल्या दिवशी आपली कक्षमता सिद्ध केली आहे. त्याने जपानी ग्रँडमास्टर हिकारू नाकामुराचा पराभव केला.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 28, 2025 | 04:02 PM
Clutch Chess: D. Gukesh takes down 'Maj'! Hikaru Nakamura, who threw away 'King' with a silent move, is defeated; Read in detail

Clutch Chess: D. Gukesh takes down 'Maj'! Hikaru Nakamura, who threw away 'King' with a silent move, is defeated; Read in detail

Follow Us
Close
Follow Us:

D. Gukesh vs Hikaru Nakamura: डी. गुकेशने सेंट लुईस, मिसूरी, यूएसए येथे झालेल्या क्लच चेस: चॅम्पियन्स शोडाऊनच्या पहिल्या दिवशी आपला दबदबा राखला आहे.  तो जागतिक बुद्धिबळ विजेता  का आहे हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. जगातील अव्वल चार खेळाडूंचा समावेश असलेली ही एक छोटी रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा आहे. या स्पर्धेत गुकेश व्यतिरिक्त, मॅग्नस कार्लसन, हिकारू नाकामुरा आणि फॅबियानो कारुआना देखील सहभागी होत आहेत. कार्लसनविरुद्ध गुकेशची सुरुवात जरी खराब झाली असली तरी त्याने नाकामुरा आणि कारुआनाविरुद्ध लागोपाठ दोन विजय मिळवून जोरदार पुनरागमन केले आहे. नाकामुराविरुद्धचा हा विजय जास्तच विशेष ठरला आहे. काही दिवसांपूर्वी जपानी ग्रँडमास्टर हिकारू नाकामुराने गुकेशवर मिळवलेल्या विजयानंतर गैरवर्तन केले होते.

हेही वाचा : काय सांगता! भारत-पाक खेळाडू करणार ड्रेसिंग रूम शेअर? BBL मध्ये दिसणार ‘हे’ खेळाडू एकत्र

क्लच चेस: चॅम्पियन्स शोडाऊन स्पर्धेच्या पहिल्या दिवशी, गुकेशला पहिल्या फेरीत मॅग्नस कार्लसनकडून 0.5-1.5 असा पराभव पत्करावा लागला. तथापि, त्याने जगातील सर्वोत्तम रॅपिड स्पेशालिस्ट मानल्या जाणाऱ्या हिकारू नाकामुराविरुद्ध १.५-०.५ असा विजय मिळवत जोरदार पुनरागमन करून आपली क्षमता सिद्ध केली. तथापि, विजय मिळवल्यानंतर डी गुकेश शांत राहिल्याचे दिसून आले णि काही दिवसांपूर्वी त्याच्या प्रतिस्पर्ध्यासारखा आनंद साजरा करणे त्याने टाळले. डी गुकेशने पहिल्या दिवसाचा शेवट फॅबियानो कारुआनाविरुद्ध २-० असा असा दमदार विजय मिळवून केला, अशा पद्धतीने पहिल्या दिवसाचा शेवट ४/६ गुणांनी असा झाला.

चेकमेट: यूएसए विरुद्ध भारत स्पर्धेनंतर, हिकारू नाकामुराने आपल्या चालीचा बचाव केला आणि म्हटले की ते केवळ मनोरंजनासाठी होते, अपमान करण्यासाठी नाही. पुढच्या वेळी जर त्याने गुकेशला पराभूत केले तर त्याने त्याला बॉलीवूड गाणे गाण्याची संधी देखील येईल असे म्हटले.

हेही वाचा : PAK vs SA : बाबर आझम, काय होतास तू? काय झालास तू? पाकिस्तानी संघाच्या मुख्य प्रशिक्षकांनी जारी केला ‘हा’ आदेश

नाकामुरा म्हणाला की तो अपमान नव्हता,  जर तो कॅंडिडेट्ससारखा गंभीर सामना असता, तर अर्थातच, तुमहाच्याकडून असे कधीही केले नसते. कोणी देखील करणार नाही! तो मॅग्नस कार्लसन, हान्स निमन, अनिश गिरी किंवा मी असलो तरी काही एक फरक पडत नव्हता. पण तो एक पूर्णपणे असा एक मनोरंजक कार्यक्रम होता. डी गुकेशने या घटनेवर एक देखील प्रतिक्रिया दिली नाही.

Web Title: D gukesh defeated hikaru nakamura in clutch chess tournament

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 04:02 PM

Topics:  

  • D Gukesh

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.