बाबर आझम(फोटो-सोशल मीडिया)
Babar Azam’s batting order in the Pakistan cricket team : पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची टी-२० मालिका आज म्हणजेच २८ ऑक्टोबरपासून रावळपिंडी येथे खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघांमध्ये नुकतेची दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली आहे. दोन सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. सर्वांचे लक्ष आता या टी-२० मालिकेवर लागून आहे. विशेषतः कारण ही पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमचे आता पुनरागमन झाले आहे. जवळजवळ एक वर्षानंतर संघात परतणारा बाबर या मालिकेत एका नवीन भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज फखर झमानला या टी-२० मालिकेतून विश्रांती दिली गेली आहे. २०२५ च्या आशिया कपमधील त्याची कामगिरी अपेक्षेनुसार राहिली नाही, त्यामुळे संघ व्यवस्थापनाने त्याला विश्रांती देण्याचा विचार केला तसेच दिली जेणेकरून तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याच्या फॉर्म आणि तंत्रावर आधीक काम करू शकेल. त्याच्या अनुपस्थितीमुळे बाबर आझमला संघात परतण्याचे दरवाजे उघडे झाले आहेत. मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांनी पत्रकार परिषदेत फखरच्या जागी बाबरचा संघात समावेश करण्यात आला या गोष्टीला दुजोरा दिला आहे.
बाबर आझम हा पाकिस्तान संघाचा सर्वात विश्वासार्ह सलामीवीर मानला जात होता, परंतु यावेळी मात्र त्याला त्या स्थानावरून काढून टाकण्यात आले आहे. क्रिकेट चाहते जागा बदलीला पाकिस्तान संघातील बाबर आझमचा अपमान असल्याचे म्हणत आहेत. दरम्यान, पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक माइक हेसन यांनी सांगितले की बाबर आता तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरणार आहे. ते म्हणाले, “बाबरकडे भरपूर अनुभव असून तिसऱ्या क्रमांकाचे स्थान त्याला जास्त अनुकूल असणार आहे. हे स्थान त्याला थोडे वेगळे वाटेल, कारण तो नेहमीच सलामीला येत असतो, परंतु त्यामुळे संघाला वरच्या क्रमात नवीन खेळाडूला आजमावण्याची संधी मिळणार आहे.”
या निर्णयानंतर, पाकिस्तानी क्रिकेट चाहते आणि काही माजी खेळाडू याला बाबरचा अपमान झाला असल्याचे बोलते आहेत. कारण वर्षानुवर्षे संघाचा कणा म्हणून राहिलेल्या खेळाडूला आता सलामीच्या सामन्यातून काढून तिसऱ्या क्रमांकावर खाली खेचले गेले आहे.तथापि, बाबरच्या अनुभवामुळे संघाची मधली फळी अधिक बळकट होणार आहे आणि तो या भूमिकेत पुन्हा स्वतःला सिद्ध करेल असा विश्वास हेसनला वाटत आहे.






