Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICC ODI Ranking : हिटमॅन साम्राज्य खालसा! डॅरिल मिशेलचा मोठा कारनामा; अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा दुसराच फलंदाज

नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसी पुरुषांच्या एकदिवसीय क्रमवारीत न्यूझीलंडचा डॅरिल मिशेलने रोहित शर्माला मागे टाकून आयसीसी पुरुषांच्या एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 19, 2025 | 05:27 PM
ICC ODI Ranking: Hitman Samraj Khalsa! Daryl Mitchell's big feat; only the second New Zealand batsman to achieve such a feat

ICC ODI Ranking: Hitman Samraj Khalsa! Daryl Mitchell's big feat; only the second New Zealand batsman to achieve such a feat

Follow Us
Close
Follow Us:
  • न्यूझीलंडचा डॅरिल मिशेलने पटकावले आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत पहिले स्थान 
  • डॅरिल मिशेलने रोहित शर्माला मागे टाकत गाठले पहिले स्थान 
  • आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारा मिशेल दुसरा किवी खेळाडू ठरला
Daryl Mitchell ranked number 1 in ICC ODI Rankings : न्यूझीलंडचा डॅरिल मिशेलने रोहित शर्माला पिछाडीवर टाकून आयसीसी पुरुषांच्या एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानावर कब्जा केला आहे.मात्र, भारतीय जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत आपले अव्वल स्थान कायम राखण्यात यश मिळवले आहे. न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेलने १६ नोव्हेंबर रोजी वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात ११९ धावा फटकावल्या होत्या, हे त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील सातवे शतक ठरले आहे. तथापि, पाठीच्या दुखापतीमुळे त्याला मालिकेतील उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडाव लागले.

हेही वाचा : IND vs SA : गुवाहाटीच्या लाल खेळपट्टीवर भारत कुणाला देणार संधी? कोणती असेल प्लेइंग-11? वाचा सविस्तर

डॅरिल मिशेल हा आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारा दुसरा किवी खेळाडू ठरला आहे. मिशेलच्या आधी, ग्लेन टर्नर १९७९ मध्ये पुरुषांच्या एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान गाठले होते. असे करणारा तो पहिलाच न्यूझीलंडचा खेळाडू बनला होता. यासह, रोहित शर्माचे २२ दिवसांचे राज्य आता खालसा झाले आहे.  मिशेलने दोन स्थानांनी प्रगती करत अफगाणिस्तानचा इब्राहिम झद्रान आणि भारताचा रोहित शर्मा यांना मागे टाकत पहिले स्थान प्राप्त केले आहे.

न्यूझीलंडचा संघातील मार्टिन क्रो, अँड्र्यू जोन्स, रॉजर टूस, नॅथन अ‍ॅस्टल, केन विल्यमसन, मार्टिन गुप्टिल आणि रॉस टेलर हे सर्वजण त्यांच्या शानदार कारकिर्दीत एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या पाचमध्ये सामील झाले होते, परंतु आता फक्त टर्नर आणि मिशेल यांनीच पहिले स्थान पटकावण्याची किमया साधली आहे.

दरम्यान, रावळपिंडीत श्रीलंकेविरुद्ध १०२ धावा करणाऱ्या पाकिस्तानचा बाबर आझमला फायदा होऊन तो सहाव्या स्थानावर जाऊन पोहोचला आहे. मालिकेत प्रत्येकी दोन अर्धशतके झळकावल्यानंतर मोहम्मद रिझवान आणि फखर जमान अनुक्रमे २२ व्या आणि २६ व्या स्थानावर विराजमान झाले आहेत.

पाकिस्तानी लेग-स्पिनर अबरार अहमदने एकदिवसीय गोलंदाजांच्या यादीत ११ स्थानांनी झेप घेत नववे स्थान पटकावले आहे.  श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अबरारने ४१ धावा देऊन ३ बळी टिपले होते. पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हरिस रौफला  पाच स्थानांचा फायदा होऊन  २३ व्या स्थान पटकावले आहे. त्याशिवाय, वेस्ट इंडिजचा जयडेन सील्स तीन स्थानांनी प्रगती करून २० व्या स्थानी पोहोचला आहे. रोस्टन चेसने १२ स्थानांची प्रगती साधत तो ४६ व्या स्थानावर पोहचला आहे.

हेही वाचा : Hardik Pandya Romantic Mood : रोमँटिक फोटोसाठी हार्दिक पंड्याची नवी शक्कल! महिका शर्माला मांडीवर घेत केला किस

कसोटी क्रमवारीत, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात एकूण सहा विकेट्स घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने अव्वल स्थान कायम राखले असून दरम्यान, कुलदीप यादव दोन स्थानांनी प्रगती करत कारकिर्दीतील सर्वोत्तम १३ व्या स्थान पटकावले आहे. रवींद्र जडेजा चार स्थानांनी प्रगती करत १५ व्या स्थानावर पोहोचला आहे. ईडन गार्डन्सवर आठ विकेट्स घेणारा दक्षिण आफ्रिकेचा ऑफस्पिनर सायमन हार्मर २० स्थानांनी मोठी झेप घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम २४ व्या स्थानावर जाऊन पोहोचला आहे.

Web Title: Daryl mitchell overtakes rohit sharma to become number 1 in icc odi rankings

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 05:25 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.