

डेक्कनच्या कोर्टवर जागतिक कुमार टेनिसचा थरार
पुण्याच्या टेनिस कोर्टवर १२ देशांची झुंज
आयटीएफ जे१०० स्पर्धेला २८ नोव्हेंबरपासून सुरुवात
Table Tennis: पुण्यातील डेक्कन जिमखाना कोर्टवर २८ नोव्हेंबरपासून जागतिक कुमार टेनिसचा थरार रंगणार आहे. १२ देशांतील अव्वल खेळाडू आयटीएफ जे १०० स्पर्धेत झुंजणार असून, वानमिन किम आणि आओई वातानाबे अग्रमानांकित आहेत; घरच्या मैदानावर भारतीय खेळाडू मात्र मोलाचे आयटीएफ (Pune) गुण कमावण्यासाठी सज्ज आहेत.
डेक्कन जिमखान्यातर्फे आयोजित गद्रे सीफूडस-डेक्कन जिमखाना-एमएसएलटीए आयटीएफ जे१०० कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धा आयटीएफ, एआयटीए, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) आणि पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) यांच्या मान्यतेने २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२६ दरम्यान डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर होणार आहे. मुलांच्या गटात कोरियाचा वानमिन किम, तर मुलींच्या गटात जपानची आओई वातानाबे अग्रमानांकित आहे.
स्पर्धा संचालक आणि डेक्कन जिमखान्याच्या टेनिस विभागाचे सचिव डॉ. विक्रांत साने यांनी सांगितले, की भारत, कोरिया, जपान, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, ग्रेट ब्रिटन, रशिया, न्यूझीलंड, उझबेकिस्तान, अमेरिका, नॉर्थ मॅसिडोनिया आणि फ्रान्स या १२ देशांतील खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेची लोकप्रियता जगभरात वाढत असल्याचे हे चित्र आहे. भारती हॉस्पिटल अधिकृत हेल्थकेअर पार्टनर आहे.
घरच्या मैदानावर खेळण्याची संधी असल्याने भारतीय खेळाडूंना महत्त्वपूर्ण आयटीएफ गुण मिळवता येतील. एकेरीतील विजेत्याला एमव्ही देव स्मृती करंडक आणि १०० गुण, उपविजेत्याला ६० गुण मिळतील. दुहेरीतील विजेत्यांना ७५, तर उपविजेत्यांना ४५ गुण दिले जातील. २०२७ मधील ऑस्ट्रेलियन ओपन ज्युनियर स्पर्धेसाठी ही स्पर्धा उपयुक्त ठरेल, असे साने म्हणाले.
गेल्या १२ वर्षांपासून स्पर्धेला पाठबळ देणाऱ्या गद्रे मरीन आणि एमएसएलटीएचे साने यांनी आभार मानले. मुख्य प्रायोजक गद्रे मरीन एक्स्पोर्ट प्रायव्हेट लिमिटेडचे संकल्प थाळी म्हणाले, की स्पर्धेत चुरशीचे सामने पाहायला मिळतील आणि महाराष्ट्रातील व भारतीय खेळाडूंना त्याचा फायदा होईल. सर्व खेळाडूंना कंपनीची आरोग्यदायी उत्पादने दिली जाणार आहेत.
वैशाली शेकटकर यांची आयटीएफ सुपरवायझर म्हणून निवड करण्यात आली आहे. पात्रता फेरीचे सामने शनिवारी २८ आणि रविवारी २९ नोव्हेंबरला होतील, तर मुख्य फेरीला सोमवारी ३० नोव्हेंबरपासून सुरुवात होईल. गतवर्षी मुलांमध्ये भारताचा गौतम वेंकटरमण आणि मुलींमध्ये अल्बिना काकीनोव्हा विजेते ठरले होते.
Table Tennis: नादच खुळा! Gourav Rao ने जिंकले ‘या’ स्पर्धेचे विजेतेपद; मोहित सोरडे याचा ६-१ अन् थेट…
अव्वल आठ (कंसात आयटीएफ क्रमवारी)
मुले
१. वानमिन किम (१४९, दक्षिण कोरिया)
२. टे वू किम (१७२, दक्षिण कोरिया)
३. रिकू नाकामोटो (१७३, जपान)
४. तविश पाहवा (१७७, भारत)
५. प्रतीक नवीन (२९८, ऑस्ट्रेलिया)
६. शौर्य भारद्वाज (३४०, भारत)
७. मन्नान अग्रवाल (३७६, भारत)
८. ल्यूक जी झी हो (४२१, सिंगापूर)
१. आओई वातानाबे (९४, जपान)
२. तात्याना गोलोविना (१४४, रशिया)
३. दिया रमेश (१८७, भारत)
४. एलिझावेता नालेस्नी (२०१, रशिया)
५. लिसा अन्झाई (२२९, जपान)
६. यश्विथा रेड्डी (२६७, न्यूझीलंड)
७. हरिता श्री व्यंकटेश (३१९, भारत)
८. दीपशिखा विनयागमूर्ती (३५०, भारत)
वेळापत्रक आणि आयटीएफ गुण एका नजरेत
स्पर्धा कालावधी: २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२६
पात्रता फेरी: शनिवार, २८ आणि रविवार, २९ नोव्हेंबर
मुख्य फेरी: सोमवार, ३० नोव्हेंबरपासून
एकेरी: विजेत्याला एमव्ही देव स्मृती करंडक आणि १०० गुण; उपविजेत्याला ६० गुण
दुहेरी: विजेत्यांना ७५ गुण; उपविजेत्यांना ४५ गुण
गतविजेते: गौतम वेंकटरमण (मुले), अल्बिना काकीनोव्हा (मुली)
पुण्यातील जागतिक कुमार टेनिस स्पर्धेला कधी आणि कुठे सुरुवात होणार आहे?
पुण्यातील डेक्कन जिमखाना कोर्टवर २८ नोव्हेंबरपासून जागतिक कुमार टेनिस स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
पुण्यातील आयटीएफ जे१०० टेनिस स्पर्धेत किती देशांतील खेळाडू सहभागी होणार आहेत?
पुण्यात होणाऱ्या आयटीएफ जे१०० टेनिस स्पर्धेत १२ देशांतील अव्वल कुमार टेनिसपटू सहभागी होणार आहेत.