२०० जागतिक वर्ल्ड मास्टर्स टेनिस स्पर्धा (फोटो- istockphoto)
एनईएस सायन्स कॉलेज येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत ४० वर्षांवरील पुरुष गटात अंतिम फेरीत बिगर मानांकित गणेश देवखिळेने दुसऱ्या मानांकित जय नारायण के.आर.चा २-६, ६-३, १०-४ असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. ५० वर्षांवरील पुरुष गटात अंतिम फेरीत संजय चंदवानीने अव्वल मानांकित जितेंद्र गंभीरचा ६-२, ६-० असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
Table Tennis: नादच खुळा! Gourav Rao ने जिंकले ‘या’ स्पर्धेचे विजेतेपद; मोहित सोरडे याचा ६-१ अन् थेट…
३५ वर्षांवरील पुरुष गटात अंतिम लढतीत अव्वल मानांकित गौरबदीप घोषने शशांक बोमनाळेचा ६-१, ६-० असा सहज पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. ४५ वर्षांवरील पुरुष गटात अंतिम सामन्यात अव्वल मानांकित स्वरणदीप सिंग धोडीने पराग अत्रेवर ७-५, ६-१ असा विजय मिळवत विजेतेपद पटकावले.
५५ वर्षांवरील पुरुष: उपांत्यपूर्व फेरी
केतन बेडेकर (भारत) वि.जितेंद्र जोशी (भारत)६-०, ६-१;
एलामुरुगु अय्यासामी (भारत) वि.वि.सुनील मिश्रा (भारत)६-२, ६-३;
अशोक इंग्ले(भारत)वि.वि.धरमवीर सिंग(भारत)६-१, ६-३;
६० वर्षां पुरुष: उपान्त्य पूर्व फेरी:
आलोक रैना (भारत)वि.वि.एकनाथराव घोडेकर (भारत)६-१, ६-१;
संजय कुमार(भारत)वि.वि.विजय काम (भारत)६-३, ६-३;
७० वर्षे पुरुष: उपान्त्य पूर्वेकडील फेरी:
Table Tennis कोर्टवर महाराष्ट्राच्या लेकीचा डंका! मायरा शेखला दुहेरी विजेतेपदाची संधी
शिव मोर (भारत)वि.वि.शिवाजी पक्ष (भारत)६-१, ७-५;
शाम गायकवाड (भारत)वि.वि.नरहरीकडेकर (भारत)६-१, ६-१
नांदेड डिस्ट्रिक्ट अँड सिटी लॉन टेनिस संघटनेच्या वतीने, आयटीएफ, एआयटीए आणि एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली आयोजित कोहिनूर-एनईएस एमटी-२०० जागतिक वर्ल्ड मास्टर्स वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत ३० वर्षांवरील पुरुष एकेरीत गौरव राव याने विजेतेपद पटकावले. एनईएस सायन्स कॉलेज येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत देशभरातील अनुभवी टेनिसपटूंनी सहभाग घेतला आहे. ३० वर्षांवरील पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात दुसरा मानांकित गौरव राव याने अव्वल मानांकित मोहित सोरडे याचा ६-१, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत गौरवने सामन्यावर वर्चस्व राखले.
Ans: ४० वर्षांवरील पुरुष गटात बिगर मानांकित गणेश देवखिळे यांनी अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित जय नारायण के.आर. यांचा २-६, ६-३, १०-४ असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
Ans: ५० वर्षांवरील पुरुष गटात संजय चंदवानी यांनी अंतिम फेरीत अव्वल मानांकित जितेंद्र गंभीर यांचा ६-२, ६-० असा पराभव करून विजेतेपदावर नाव कोरले.






