टेबल टेनिस स्पर्धा (फोटो- सोशल मिडिया)
३० वर्षांवरील पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात दुसरा मानांकित गौरव राव याने अव्वल मानांकित मोहित सोरडे याचा ६-१, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत गौरवने सामन्यावर वर्चस्व राखले. मोहितला आपल्या खेळात सातत्य राखता न आल्याने गौरवने सहज विजय मिळवत विजेतेपदावर नाव कोरले.
३० वर्षांवरील महिला गटाच्या उपांत्य फेरीत रेखा होळंबे हिने कल्पना खानापुरे हिच्यावर ६-०, ६-१ असा एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. तृप्ती होळंबे हिने पुढे चाल मिळवत अंतिम फेरी गाठली.३५ वर्षांवरील पुरुष गटाच्या उपांत्य फेरीत शशांक बोमनाळे याने विनीत तेहरा याचा ६-४, ६-२ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
Table Tennis कोर्टवर महाराष्ट्राच्या लेकीचा डंका! मायरा शेखला दुहेरी विजेतेपदाची संधी
४० वर्षांवरील पुरुष गटात बिगरमानांकित गणेश देवखिळे याने अव्वल मानांकित राम कुमार चौधरी याला ६-२, ७-५ असे नमवत स्पर्धेत मोठा धक्का दिला. दुसरा मानांकित जयनारायण केआर याने लक्ष्मीनिवास कलंत्रीचा ६-१, ६-२ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.४५ वर्षांवरील पुरुष गटाच्या उपांत्य फेरीत अव्वल मानांकित स्वरणदीप सिंग धोडी याने नीलेश चांडकचा ६-३, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. तर पराग अत्रे यांना पुढे चाल मिळाल्याने त्यांनीही अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यामुळे या गटातील अंतिम सामन्याकडे टेनिसप्रेमींचे लक्ष लागले आहे.
३० वर्षांवरील पुरुष – अंतिम फेरी
गौरव राव (भारत) [२] विजयी वि. मोहित सोरडे (भारत) [१] — ६-१, ६-२
३० वर्षांवरील महिला – उपांत्य फेरी
रेखा होळंबे (भारत) विजयी वि. कल्पना खानापुरे (भारत) — ६-०, ६-१
तृप्ती होळंबे (भारत) — पुढे चाल वि. सपना शहा (भारत) [१]
३५ वर्षांवरील पुरुष – उपांत्य फेरी
शशांक बोमनाळे (भारत) विजयी वि. विनीत तेहरा (भारत) — ६-४, ६-२
Table Tennis: टेबल टेनिसमध्ये युवा खेळाडूंचा जलवा! आरव, शरण्यासह पाच जणांची विजेतेपदाला गवसणी
४० वर्षांवरील पुरुष – उपांत्य फेरी
गणेश देवखिळे (भारत) विजयी वि. राम कुमार चौधरी (भारत) [१] — ६-२, ७-५
जयनारायण केआर (भारत) [२] विजयी वि. लक्ष्मीनिवास कलंत्री (भारत) — ६-१, ६-२
४५ वर्षांवरील पुरुष – उपांत्य फेरी
स्वरणदीप सिंग धोडी (भारत) [१] विजयी वि. नीलेश चांडक (भारत) — ६-३, ६-२
पराग अत्रे (भारत) — पुढे चाल वि. अरिंदम देब (भारत)
Ans: गौरव रावने अंतिम सामन्यात अव्वल मानांकित मोहित सोरडे याचा ६-१, ६-२ अशा सरळ सेटमध्ये पराभव केला.
Ans: जागतिक वर्ल्ड मास्टर्स टेनिस स्पर्धेत ३० वर्षांवरील पुरुष एकेरीचे विजेतेपद गौरव राव याने पटकावले.






