Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

या भारतीय महिला क्रिकेटरचा कहर विदेशातही! षटकार ठोकून ‘द हंड्रेड’चा किताब केला नावावर

लंडन स्पिरिट या संघाने ९८ चेंडूंमध्ये ११६ धावांचे लक्ष्य पूर्ण केले आणि संघाला विजय मिळवून दिले. लंडन स्पिरीट वुमन आणि वेल्श फायर वुमन यांच्यात खेळला गेलेला अंतिम सामना अतिशय रोमांचक झाला आणि शेवटपर्यंत कायम राहिला. यामध्ये विशेष कौतुक भारतीय महिला क्रिकेट संघाची अष्टपैलू दीप्ती शर्माच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 19, 2024 | 10:56 AM
फोटो सौजन्य - The Hundred सोशल मीडिया

फोटो सौजन्य - The Hundred सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

‘द हंड्रेड वुमेन्स २०२४ फायनल’ : ‘द हंड्रेड वुमेन्स २०२४’ ची काल फायनलचा सामना पार पडला. या अंतिम सामन्यामध्ये वेल्श फायर विरुद्ध लंडन स्पिरिट यांच्यामध्ये हा सामना रंगला होता. लंडन स्पिरिट महिला संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये वेल्श फायर महिला संघाने पहिले फलंदाजी करून ८ विकेट्स गमावून ११५ धावा केल्या होत्या. लंडन स्पिरिट महिला संघाला ‘द हंड्रेड वुमेन्स २०२४’ चे जेतेपद मिळवण्यासाठी ११६ धावांची गरज होती. लंडन स्पिरिट या संघाने ९८ चेंडूंमध्ये ११६ धावांचे लक्ष्य पूर्ण केले आणि संघाला विजय मिळवून दिले. लंडन स्पिरीट वुमन आणि वेल्श फायर वुमन यांच्यात खेळला गेलेला अंतिम सामना अतिशय रोमांचक झाला आणि शेवटपर्यंत कायम राहिला.

भारताची अष्टपैलू दीप्ती शर्माची कामगिरी

‘द हंड्रेड वुमेन्स २०२४’ यामध्ये दीप्ती शर्मा लंडन स्पिरिट या संघामधून खेळत होती. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या लंडन स्पिरीटला विजेतेपदासाठी शेवटच्या ३ चेंडूत ४ धावांची गरज होती. तोपर्यंत संघाने ६ विकेट गमावल्या होत्या. भारतीय क्रिकेट संघाची स्टार दीप्ती शर्मा या संपावर उपस्थित होती. एकेरी घेण्याऐवजी दीप्तीने गोलंदाजी करणाऱ्या हिली मॅथ्यूजला षटकार खेचून संघाला विजय मिळवून दिला. दीप्तीचा षटकार पाहून तिच्या संघातील बाकीचे खेळाडू पूर्णपणे चकित झाले.

हेदेखील वाचा – आयपीएल २०२५ मध्ये रिंकू सिंह या संघामधून खेळणार? खेळाडूने स्वतः केला खुलासा

लंडन स्पिरीटने जेतेपद केले नावावर

११६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लंडन स्पिरिट संघाने ९८ चेंडूत ११८/६ धावा करून विजयाची नोंद केली. जॉर्जिया रेडमायनने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली आणि ३२ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने ३४ धावा केल्या. या शानदार खेळीसाठी जॉर्जिया रेडमायनला ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा किताबही देण्यात आला.

With 4️⃣ runs needed and 3️⃣ balls left, Deepti Sharma hits a 6️⃣ to WIN it! 😳#TheHundred https://t.co/u57MSy7ga0 pic.twitter.com/i46RTvWFG1

— The Hundred (@thehundred) August 18, 2024

Web Title: Deepti sharma hit a winning shot for london spirit team and won the hundred league

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2024 | 10:56 AM

Topics:  

  • Women Cricket

संबंधित बातम्या

महिला T20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या अंतिम सामना कुठे खेळला जाईल?
1

महिला T20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या अंतिम सामना कुठे खेळला जाईल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.