IPL 2025: Captain Cool returns! Will MS Dhoni take over as CSK captain? Fans are curious...
IPL 2025 : आयपीएल 2025 मधून एक बातमी समोर आली आहे. कहर तर ती चेन्नई सुपर किंगच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी आहे. कॅप्टन कुल म्हणून ज्याला ओळखल जातं असा महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा चेन्नईचे कर्णधारपद स्वीकारणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे थालाप्रेमी मात्र या चर्चेने सुखावले असतील हे नक्की.
आज चेन्नई सुपर किंग्जचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध असणार आहे. संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आजच्या सामन्यात खेळणार नसल्याचे समजत आहे. अशा स्थितीत संघाची कमान कोण सांभाळणार? हा मोठा प्रश्न निर्माण उपस्थित झाला आहे.
हेही वाचा : LSG VS MI : मुंबई इंडियन्सचा IPL 2025 मधील तिसरा पराभव, लखनऊने घरच्या मैदानावर MI ला केलं पराभूत
चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक असेलले मायकेल हसी याने शनिवारी सीएसकेविरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा तो म्हणाला की ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त आहे, त्यामुळे तो पुढील सामना खेळू शकेल की नाही? हे निश्चितपणे सांगता येणार नाही.
राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यात ऋतुराज गायकवाडला तुषार देशपांडेच्या चेंडूवर दुखापत झाली होती. आता सामन्यापूर्वी ऋतुराज गायकवाडची फिटनेस चाचणी पार पडणार आहे. त्यानंतरच तो खेळू शकणार आहे. अशा स्थितीत सध्या गायकवाड पुढच्या सामन्याला मुकणार आहे असे बोलले जाता आहे.
तसेच मायकल हसी पुढे म्हणाला की, रुतुराज गायकवाड अजूनही दुखापतीत आहे. कर्णधारपदाबाबत हसी बोलला की, ही जबाबदारी कोण सांभाळणार हे अद्याप ठरलेले नाही. त्याची जागा एक युवा यष्टिरक्षक घेण्याची शक्यता आहे. आता धोनीशिवाय संघात यष्टीरक्षक कोण आहे, जो संघाची धुरा वाहू शकतो? हे आमंत्र कळत नाही. त्यामुळे हसी धोनीबद्दल बोलत होता. असे समजते.
तसेच असे बोलले जात आहे की, रवींद्र जडेजा देखील कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारू शकतो. परंतु त्याने एका हंगामासाठी कर्णधारपद भूषवले आणि खराब खेळानंतर त्याला मधेच पुन्हा धोनीकडे ही परत द्यावी लागली होती. अशा परिस्थितीत तो पुन्हा कर्णधार होण्याची शक्यता कमी दिसून येत आहे.
एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसके संघाने आजवर पाच आयपीएल विजेतेपद आपल्या केले आहेत. 2023 मध्ये, जेव्हा चेन्नई सुपर किंगने गुजरात टायटन्सला पराभूत करून शेवटच्या वेळी आयपीएलचे विजेतेपद जिंकले होते. धोनीच संघाचा कर्णधार होता. यानंतर पुढच्या हंगामात म्हणजेच 2024 मध्ये रुतुराज गायकवाडला कर्णधारपद सोपवण्यात आले. पण त्यानंतर संघाला मात्र अंतिम चारमध्ये आपली जागा राखता आली नाही.