श्रेयस अय्यरने भारतासाठी एकदिवसीय सामन्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर चांगली कामगिरी केली आहे, परंतु दुखापतीमुळे संघ व्यवस्थापनाने गायकवाडला ही भूमिका सोपवली. अश्विनने गायकवाडबद्दल आपले विचार स्पष्टपणे व्यक्त केले.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या एकदिसीय सामन्यात भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने सलग दोन शतके ठोकली आहेत. त्याच्या शतकावर माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर यांनी भाष्य केले आहे.
पराभवानंतर, कर्णधार केएल राहुलने एक महत्त्वपूर्ण विधान केले आणि पराभवाचे खरे कारण उघड केले. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून एडेन मार्कराम आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांनी शानदार फलंदाजी केली.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टॉस गमावून भारताने प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३५९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात असलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने आपले ५३ वे शतक ठोकले आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने शतक ठोकले आहे. ऋतुराज गायकवाडने चार नंबरवर येऊन शतक ठोकले आहे.
क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी ऋतुराज गायकवाड यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी संघ व्यवस्थापनाला स्पष्टपणे सांगितले आहे. घरगुती क्रिकेटमध्ये खूप धावा करणारा ऋतुराज गायकवाड अपयशी ठरला असे वाटत होते.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना रांची येथे होणार आहे. या सामन्यासाठी सर्वजण खूप उत्सुक आहेत. ऋषभ पंत, ऋतुराज गायकवाड आणि तिलक वर्मा यांना संघात समाविष्ट करण्यात आले आहे.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने टी-२० कारकिर्दीत ५००० धावा पूर्ण करून विक्रम केला आहे. यामध्ये आयपीएलमधील सर्व सामने, आंतरराष्ट्रीय टी-२० आणि देशांतर्गत टी-२० सामन्यांचा समावेश आहे.
शुभमन गिल दुखापतीमुळे खेळू शकत नाही आणि केएल राहुल संघाचे नेतृत्व करेल. रुतुराज गायकवाडचे एकदिवसीय संघात पुनरागमन झाले आहे. तो गेल्या काही काळापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे.
बीसीसीआय सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५-२६ च्या पहिल्या तीन लीग सामन्यांसाठी महाराष्ट्र वरिष्ठ पुरुष संघाची घोषणा करण्यात आली आहे. अनुभवी फलंदाज रुतुराज गायकवाडकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
आयपीएल २०२६ रिटेन्शन प्रक्रिया पूर्ण झाली असून सर्व फ्रँचायझींनी त्यांच्या रिटेन्शन आणि रिलीज झालेल्या खेळाडूंच्या यादी जाहीर केल्या आहेत. सीएसकेने राजस्थान रॉयल्सकडून संजू सॅमसनला खरेदी केले आहे.
२८६ धावांच्या पाठलागात गायकवाडने ११७ धावांची शानदार खेळी केली. एकदिवसीय सामना हायलाइट्स- ऋतुराज गायकवाडच्या शतकाच्या बळावर, भारत अ संघाने पहिल्या अनधिकृत एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका अ संघाचा ४ विकेट्सने पराभव…
भारत अ आणि दक्षिण आफ्रिका अ संघ यांच्यातील तीन सामन्यांची अनधिकृत एकदिवसीय मालिका १३ ते १९ नोव्हेंबर दरम्यान राजकोट येथे खेळवली जाईल. तिलक वर्मा संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारत अ संघाची घोषणा करण्यात आली आहे. तिलक वर्मा यांची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर ऋतुराज गायकवाड यांची उपकर्णधार असणार…
भारतीय खेळाडू ऋतुराज गायकवाडने त्याच्या वैयक्तिक कारणांमुळे मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तो आता इंग्लंडमध्ये होणाऱ्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळताना दिसणार नाही.
परेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशात दरी निर्माण झाली आहे. अशातच आता पाकिस्तानी अब्दुल्ला शफीक तर भारताचा ऋतुराज गायकवाड हे खेळाडू काउंटी क्रिकेटमध्ये एकत्र खेळताणा दिसणार आहेत.
२० जूनपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेत ऋतुराज गायकवाडला संधी देण्यात आली नाही. तो आता काउंटी संघ यॉर्कशायरकडून खेळताना दिसणार आहे.