फोटो सौजन्य - सोशल मिडिया
२९ ऑगस्ट रोजी झुरिच येथे डायमंड लीग फायनल स्पर्धा पार पडली.यामध्ये नीरज चोप्रा २०२२ च्या आपल्या कामगिरीची पुनरावृत्ती करू शकला नाही. जर्मनीच्या ज्युलियन वेबरने त्याला पराभूत करून जेतेपद पटकावले. वेबरने ९१.५१ मीटर भालाफेक करून एक नवीन वैयक्तिक सर्वोत्तम आणि जागतिक आघाडी निर्माण केली. यापूर्वी, वेबरने या वर्षातील सर्वात लांब भालाफेक ९१.०६ मीटर केली होती.
झुरिच डायमंड लीगमध्ये वेबरने ९१.५१ मीटर फेकून पहिले स्थान पटकावले. नीरज चोप्रा ८५.०१ मीटर फेकून दुसऱ्या स्थानावर राहिला. नीरजने सलग तीन फेकून फाऊल केले. दरम्यान, केशॉर्न वॉलकॉट ८४.९५ मीटर फेकून तिसऱ्या स्थानावर राहिला. नीरज चोप्राची ही दुसरी डायमंड लीग फायनल स्पर्धा होती. त्याने २०२२ मध्ये झुरिचमध्ये ८८.४४ मीटर फेकून विजेतेपद जिंकले होते, तर २०२३ आणि २०२४ मध्येही तो अंतिम फेरीत पोहोचला होता परंतु विजेतेपदापासून वंचित राहिला.
World lead for Weber!
Julian Weber wins the javelin with a monster PB of 91.51m.
That’s the furthest throw ever at a #DLFinal💎 #ZurichDL🇨🇭 #DiamondLeague
📷 @chiaramontesan2 pic.twitter.com/pLHpb6pDa1— Wanda Diamond League (@Diamond_League) August 28, 2025
डायमंड लीग २०२४ मध्ये तो फक्त १ सेंटीमीटरने विजेतेपद जिंकण्यात कमी पडला. त्याला ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने ८७.८७ मीटर फेकून पराभूत केले.
झुरिच डायमंड लीगमध्ये सहभागी झालेले खेळाडू
२०१७ चा अंतिम सामना : नीरज ८३.८० मीटर फेकून आठ पैकी सातव्या स्थानावर राहिला.
२०२२ झुरिच:- नीरज चोप्राने डायमंड लीग ट्रॉफी जिंकणारा पहिला भारतीय बनून इतिहास रचला. त्याने टोकियो २०२० रौप्यपदक विजेता जेकब वॅडलेचला हरवून ८८.४४ मीटरचा सर्वोत्तम थ्रो केला.
पीव्ही सिंधूची BWF World Championships क्वार्टर फायनलमध्ये धडक! चीनच्या वांग झीचा केला पराभव
२०२३ युजीन:- वडलेजने पुनरागमन केले आणि नीरजला मागे टाकत विजेतेपद पटकावले. नीरजने ८३.८० मीटर फेकले, तर वडलेजने ८४.२४ मीटर फेकून विजेतेपद जिंकले.
२०२४ ब्रुसेल्स:- नीरज फक्त १ सेंटीमीटरने विजेतेपद हुकला. ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने (पॅरिस २०२४ ऑलिंपिक कांस्यपदक विजेता) ८७.८७ मीटर थ्रो करून त्याचे पहिले डायमंड लीग विजेतेपद जिंकले. ज्युलियन वेबरने ८५.९७ मीटर थ्रो करून तिसरे स्थान पटकावले.