DPL 2025: Digvesh Rathi of 'Notebook Celebration' fame gets a boost in price! 'This' team fetches higher price than LSG
DPL 2025 : आयपीएल २०२५ गाजवणारा दिग्वेश राठी आता चर्चेत आला आहे. आयपीएल २०२५ मध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून शानदार कामगिरी केल्यानंतर त्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. आता त्याला साउथ दिल्ली सुपरस्टार्सने दिल्ली प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामाच्या लिलावात ३८ लाख रुपये मोजून त्यांचा संघात समावेश करून घेतला आहे.
दिल्ली प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामाचा लिलाव ६ जुलै रोजी पार पडला. या दरम्यान, सर्व फ्रँचायझींनी दिग्वेशवर बोली लावली होती. शेवटी, दिल्ली सुपरस्टार्सने ३८ लाख मोजून दिग्वेश राठीला आपल्या संघात खेचून घेतले. गेल्या वर्षी आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात लखनौने दिग्वेशला ३० लाख रुपयांना खरेदी केले होते, जे या हंगामातील त्याच्या डीपीएल पगारापेक्षा खूप कमी आहेत.
हेही वाचा : Para badminton Championship 2025 : पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताचा डंका! स्वाती आणि कनक यांची ‘सुवर्ण’ कामगिरी
आयपीएल २०२५ मध्ये लखनऊसाठी खेळताना दिग्वेशने १३ सामन्यात ८.२५ च्या इकॉनॉमीने १४ बळी मिळवले. त्यामुळे दिग्वेशची मागणी खूप वाढलेली दिसून आली. बोलीच्या शर्यतीत, जुनी दिल्ली ६ च्या संघानेही रस दाखवला होता, परंतु दक्षिण दिल्लीने आपल्या स्टार क्रिकेटपटूला त्यांच्या संघात घेण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले आणि अखेर त्यांनी 38 लाख रुपयांना राठीला संघात समाविष्ट केले. दिग्वेशने मे महिन्यात लखनऊकडून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या गट टप्प्यातील शेवटच्या सामन्यात आयपीएलमध्ये आपला शेवटचा सामना खेळला होता.
दिल्ली प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामाच्या लिलावात ५२० खेळाडूंची बोली लावण्यात आली, त्यापैकी अव्वल खेळाडूंमध्ये दिग्वेश, सिमरजीत सिंग (सेंट्रल दिल्ली किंग्जसाठी ३९ लाख रुपये), नितीश राणा (वेस्ट दिल्ली लायन्ससाठी ३४ लाख रुपये) आणि प्रिन्स यादव (नवी दिल्ली टायगर्ससाठी ३३ लाख रुपये) यांचा समावेश आहे.
लिलावापूर्वी, दक्षिण दिल्लीने आयुष बदोनीला आपल्या संघात कायम ठेवून एक हुशार पाऊल उचलले, जो जलद धावा काढण्याच्या आणि गरज पडल्यास चेंडूने योगदान देण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे. त्यांच्या संघाला अधिक मजबूत करण्यासाठी संघाने दिग्वेशला सामील केले, ज्याने आयपीएल २०२५ च्या हंगामात आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले होते. त्यानंतर संघाने आर्यवीर कोहलीला १ लाख रुपयांना विकत घेतले आहे.
हेही वाचा : IND VS ENG : ‘दो भाई, दोनो तबाही’, इंग्लंडविरुद्ध कहर करणाऱ्या सिराज-दीपची पोस्ट व्हायरल..