स्वाती आणि कनक सिंग(फोटो-सोशल मिडिया)
Para Badminton International Championship 2025 : उत्तर प्रदेशच्या मुलींनी भारत देशाचा झेंडा आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वात फडकवला आहे. लखनऊ येथील डॉ. शकुंतला मिश्रा राष्ट्रीय पुनर्वसन विद्यापीठाच्या विद्यार्थिनी असलेल्या स्वाती आणि कनक सिंग यांनी युगांडा पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धा २०२५ मध्ये सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांना गवसणी घातली.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली जमिनीवर राबवण्यात आलेल्या अपंगांच्या सक्षमीकरणाच्या धोरणांचे परियानं आता दिसू लागले आहेत. या काळात स्वाती तीन पदके जिंकण्यात यशस्वी ठरली आहे. स्वातीने सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकांची कमाई केली आहे. त्याच वेळी कनकने दोन पदके आपल्या नावावर केली. या कामगिरीने त्यांनी राज्य आणि देशाचा अभिमान वाढवला आहे.
हेही वाचा : अखेर Prithvi Shaw चा मुंबईला रामराम! ऋतुराज गायकवाडसोबत ‘या’ संघाकडून खेळणार
स्वातीने महिला एकेरी एसयू-५ श्रेणीमध्ये रौप्य, महिला दुहेरी एसएल३-एसयू५ मध्ये सुवर्ण आणि मिश्र दुहेरीमध्ये कांस्यपदकाची कमाई केली. कनक सिंगने महिला एकेरी एसएल-४ आणि महिला दुहेरीमध्ये कांस्यपदकावर नाव कोरले आहे. १ ते ६ जुलै दरम्यान युगांडाची राजधानी कंपाला येथे झालेल्या या स्पर्धेत ५० हून अधिक देशांतील पॅरा बॅडमिंटन खेळाडूंनी सहभाग घेतला.
दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन करताना, राज्याचे अपंग व्यक्ती सक्षमीकरण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) नरेंद्र कश्यप यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, स्वाती आणि कनक यांचे हे यश केवळ वैयक्तिक नसून योगी सरकारने तयार केलेल्या दिव्यांगजन सक्षमीकरण मॉडेलचे यश असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : Zim vs SA : क्रिकेट विश्वात तहलका! दक्षिण आफ्रिकेच्या Wian Mulder चे विश्वविक्रमी त्रिशतक
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दूसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा ३३६ धावांनी विजय मिळवत इतिहास घडवला आहे. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेच्या वियान मुल्डरने झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विश्वविक्रम केला आहे. दक्षिण आफ्रिकेची धुरा सांभाळणाऱ्या वियान मुल्डरने सोमवारी बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब मैदानावर झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटी सामन्यात कर्णधार म्हणून पदार्पण करून इतिहास रचला आहे. कर्णधार म्हणून पदार्पण करताना पहिल्या डावात त्रिशतक झळकवणारा मुल्डर हा कसोटी इतिहासातील पहिला खेळाडू बनला आहे. हिल्या डावात मुल्डरने नाबाद २६४ धावा काढल्यानंतर त्याने ती धावसंख्या तीन अंकी आकड्यांपर्यंत नेली. त्याने २९७ चेंडूत आपले पहिले त्रिशतक पूर्ण केले.