Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Duleep Trophy 2025 : हे तर खूपच वेदनादायी! नारायण जगदीसनला द्विशतकासाठी हव्या होत्या ३ धावा; चालू सामन्यात असे काही घडले…. 

दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या पहिला उपांत्य सामन्यात  दक्षिण विभाग आणि उत्तर विभाग हे संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात दक्षिण विभागाकडून खेळणारा फलंदाज नारायण जगदीसनचे द्विशतक हुकले. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 05, 2025 | 03:38 PM
Duleep Trophy 2025: This is very painful! Narayan Jagadeesan needed 3 runs for a double century; something like this happened in the current match....

Duleep Trophy 2025: This is very painful! Narayan Jagadeesan needed 3 runs for a double century; something like this happened in the current match....

Follow Us
Close
Follow Us:

South Zone and North Zone : बीसीसीआयकडून आयोजित करण्यात आलेल्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेचा पहिला उपांत्य सामन्यात  दक्षिण विभाग आणि उत्तर विभाग हे संघ आमनेसामने आले आहेत. यांच्यात बेंगळुरू येथील बीसीसीआय सीओई ग्राउंड-२ वर सामाना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात, दक्षिण विभागाकडून खेळणारा तमिळनाडूचा यष्टीरक्षक फलंदाज नारायण जगदीसनने एक अविस्मरणीय खेळी साकारली आहे. परंतु, त्याला द्विशतकाने हुलकावणी दिली  आहे. तो २०० धावा करण्यापासून फक्त ३ धावा दूर राहिला. या दरम्यान एक घडना घडली.

हेही वाचा : Women’s ODI World Cup 2025 : महिला विश्वचषक आता स्टेडियममध्ये पाहणं झालं सोपं, फक्त 100 रुपयात बुक करा तिकीट! वाचा सविस्तर माहिती

जगदीसननला द्विशतकाने दिली हुलकावणी..

सामन्याच्या पूर्वी उत्तर विभागानकडून  नाणेफेक जिंकून दक्षिण विभागाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आली आहे. दक्षिण विभागाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या नारायण जगदीसनने दमदार फलंदाजी केली.  जगदीसनने खेळाच्या पहिल्या दिवशी १८४ चेंडूंचा सामना करत शतक पूर्ण केले होते. त्याने दुसऱ्या दिवशी देखील सावध फलंदाजी केली आणि दुसऱ्या दिवशी देखील तो  क्रीजवर थांबून होता. त्याने १५९ धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याने तब्बल २६२ चेंडू घेतले होते. पण १९७ धावांचा टप्पा पार केल्यानंतर एक चूक नडली  आणि त्याचा मोठा फटका बसला. तो धावबाद होऊन आपली विकेट गमावून बसला.

नारायण जगदीसनने या डावात ३५२ चेंडूंचा सामना करत १९७ धावा फटकावल्या. यामध्ये त्याने १६ चौकार आणि २ षटकार देखील लगावले.  धावबाद होऊन विकेट देऊन बसल्याने जगदीसन खूप नाराज असल्याचे दिसून आला. तो द्विशतक पूर्ण करणार असे सर्वांना वाटत होते, तेच्याकडे चांगली संधी देखील होती. परंतु, द्विशतकाने त्याला हुलकवनी दिली. नारायण जगदीसनला अलीकडेच इंग्लंड दौऱ्यावरील कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये स्थान देण्यात आले होते. परंतु, त्याला पदर्पणाची संधि मात्र मिळसू शकली नाही.

हेही वाचा : SA vs ENG : जो रूटचा आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये डंका! इंग्लंडकडून केला भीम पराक्रम; इऑन मॉर्गनचा ‘तो’ विक्रम मोडला

दोन दिवसांत दुसऱ्यांदा घडला हा प्रकार

दुलीप ट्रॉफी २०२५ च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सलग दुसऱ्या दिवशी असा प्रकार घडला की, जेव्हा दोन फलंदाजांचे द्विशतक हुकले आहे. नारायण जगदीसनच्या आधी, ऋतुराज गायकवाड देखील द्विशतक पूर्ण करण्यापासून केवळ १६ धावा दूर राहिला होता. पश्चिम विभागाचा फलंदाज ऋतुराज गायकवाडने मध्य विभागाविरुद्धच्या  सामन्यात पहिल्या डावात २०६ चेंडूंचा सामना केला आणि २५ चौकार आणि १ षटकारासह १८४ धावा केल्या होत्या.

Web Title: Duleep trophy 2025 narayan jagadeesan scores a double century

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2025 | 03:38 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.