जो रूट(फोटो-सोशळ मीडिया)
Joe Root has scored the most ODI half-centuries for England : दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा महान फलंदाज जो रूटने मोठा भीम पराक्रम केला आहे. तो आता इंग्लंडकडून सर्वाधिक अर्धशतकं लगावणारा फलंदाज ठरला आहे. तथापि, इंग्लंडने लॉर्ड्सच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामना गमावला आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा ५ धावांनी पराभव केला आहे. इंग्लंडला विजयासाठी ३३१ धावांचे लक्ष्य होते, परंतु, त्यांचा संघ ३२५ धावाच करू शकला. जो रूटने या सामन्यात ६१ धावा करून एक विक्रम केला आहे.
हेही वाचा : Asia Cup 2025 : भारताचा संघ आशिया कपसाठी दुबईला रवाना! सुर्या-हार्दिक दिसले डॅशिंग लूकमध्ये…
जो रूटने नंद्रे बर्गरच्या चेंडूवर एक धाव घेऊन आपले अर्धशतक पूर्ण केले, यासोबतच त्याने इंग्लंडसाठी एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक अर्धशतके ठोकण्याचा विरकं स्वताच्या नावावर केला. त्याने या कामगिरीसह आपला देशबांधव इऑन मॉर्गनला पिछाडीवर टाकले आहे. मॉर्गनने २२५ सामन्यांमध्ये ४२ अर्धशतके झळकवली आहेत. तर जो रूटचे हे ४३ वे एकदिवसीय अर्धशतक ठरले. जो रूटने इंग्लंडकडून खेळताना १८२ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४८.९८ च्या सरासरीने ७२०१ धावा काढल्या आहेत. यामध्ये त्याने १८ शतके आणि ४३ अर्धशतकं लागावळी आहेत.
तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना गमावणाऱ्या इंग्लंडने दूसरा देखील सामना गामवाला. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने ८ गडी गमावून ३३० धावांचा डोंगर उभारला. दक्षिण आफ्रिकेकडून मार्कराम ४९, मॅथ्यू ब्रीट्झके ८५, स्टब्सने ५८, तर डेवाल्ड ब्रेव्हिसने ४२ धावा केल्या. तर धावांचा पाठलाग करणारा इंग्लंड संघ मात्र संघ निर्धारित षटकांमध्ये ९ गडी गमावून केवळ ३२५ धावाच करू शकला. इंग्लंड संघाकडून जोस बटलर आणि जो रूट यांनी प्रत्येकी ६१ धावा केल्या, तर जेकब बेथेलने ५८ धावांची खेळी साकारली, परंतु या फलंदाजांना आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले.दक्षिण आफ्रिकेकडून नांद्रे बर्गरने तीन विकेट घेतल्या. केशव महाराजांना दोन यश मिळाले. तीन सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने २-० अशी मालिका जिंकून मोठे यश मिळवले.