Duleep Trophy 2025 : West Division Team Announced; Neither Iyer, nor Rituraj, 'this' star player handed over the team's lead
West Zone team for Duleep Trophy 2025 : बीसीसीआयच्या देशांतर्गत स्पर्धेपैकी एक असलेली दुलीप ट्रॉफी स्पर्धेला २८ ऑगस्टपासून सुरवात होत आहे. या स्पर्धेत ६ संघ खेळताना दिसणार आहेत. दुलीप ट्रॉफीसाठी पश्चिम विभागाची घोषणा देखील करण्यात आली आहे. शार्दुल ठाकूरकडे या संघाचा धुरा सोपवण्यात आली आहे. श्रेयस अय्यरसारखा स्टार खेळाडू या संघाचा भाग आहे.
पश्चिम विभाग संघाचे कर्णधारपदाची जबाबदारी ३३ वर्षीय शार्दुल ठाकूरच्या खांद्यावर देण्यात आली आहे. या संघात भारतीय संघातील अनेक स्टार खेळाडूंचा भरणा आहे. यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, सरफराज खान, रुतुराज गायकवाड, तुषार देशपांडे, शम्स मुलानी आणि तनुश कोटियन यांचा या १५ सदस्यीय संघात समावेश आहे. त्याच वेळी, आता बीसीसीआयकडून अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या दोन स्टार खेळाडूंकडे पूर्णपणे कानाडोळा करण्यात आला आहे.
हेही वाचा : IND vs ENG : भारताचा पहिला डाव २२४ धावांवर गडगडला; गस अॅटकिन्सनचा विकेट्सचा पंजा
रणजी ट्रॉफी २०२४-२५ च्या हंगामामध्ये शार्दुल ठाकूर मुंबईसाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला होता. त्यासोबतच, तो सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज देखील राहिला आहे. त्याच्या शानदार कामगिरीचे बक्षीस अखेर त्याला मिळाले आहे. पश्चिम विभागाच्या निवडकर्त्यांनी श्रेयस अय्यर आणि ऋतुराज गायकवाड सारख्या स्टार खेळाडूंना बाजूला सारत शार्दुल ठाकूरवर विश्वास दाखवत कर्णधारपद सोपवले आहे. अय्यर आणि गायकवाड दोघेही आपापल्या इंडियन प्रीमियर लीगमधील संघांचे कर्णधार आहेत. तसेच त्यांनी भूतकाळात आपापल्या राज्य संघांचे नेतृत्व देखील केलेले आहे.
दुलीप ट्रॉफीचा २०२५ चा हंगाम २८ ऑगस्टपासून बेंगळुरूमध्ये सुरु होणार आहे. तथापि, पश्चिम विभाग क्वार्टर फायनल सामन्यामध्ये सहभागी होणार नसून थेट सेमीफायनलचा भाग असणार आहे. पश्चिम विभागाचा सेमीफायनल सामना ४ ते ७ सप्टेंबर दरम्यान बेंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स ग्राउंड बी येथे खेळवण्यात येणार आहे.
हेही वाचा : ७० वर्षांच्या भारतीय क्रिकेटरची २८ वर्षाची लहान नवरी; वाढदिवशी नवरदेवाला देणार खास सरप्राईज; वाचा सविस्तर..
शार्दुल ठाकूर (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, आर्य देसाई, हार्विक देसाई (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, सर्फराज खान, रुतुराज गायकवाड, जयमीत पटेल, मनन हिंगराजिया, सौरभ नवाले (यष्टीरक्षक), शम्स मुलानी, तनेश देसाई, तुषार जैस्वाल, धृषदेव कोठडी नागवासवाला.