भारताचा पहिला डाव २२४ धावांवर गडगडला(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG 5th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पाचवा सामना ओव्हल येथे खेळवेळा जात आहे. सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचा पहिला डाव २२४ धावांवर गडडला आहे. भारताकडून करुण नायर वगळता एकही खेळाडूला तग धरता आलेला नाही. नायरने ५७ धावा केल्या आहेत. इंग्लंडकडून गस अॅटकिन्सनने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या.
इंग्लंडने गोलंदाजीचा निर्णय घेणं फायद्याचे ठरले आहे. इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजीवर चांगलाच अंकुश ठेवताना दिसून आले. पहिल्याच दिवशी भारताची अवस्था ६ गडी बाद २०४ धावा अशी केली होती. भारतीय फलंदाज मैदानावर जास्त वेळ तग धरू शकले नाही. भारताकडून करुण नायरनने सर्वाधिक ५७ धावा केल्या आहेत. नायरने १०९ चेंडूचा सामना करत ५७ धावा केल्या. यामध्ये त्याने ८ चौकार लागावले.
तत्पूर्वी इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाचव्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताची सुरवात चांगली झाली नाही. यशस्वी जैस्वाल २ धावांवर बाद झाला. त्यानंतर एकामागून एक विकेट जात राहिल्या. केएल राहुल १४, साई सुदर्शन ३८, शुभमन गिल २१, करुण नायर ५७, वॉशिंग्टन सुंदर २६, रवींद्र जडेजा ९, ध्रुव जुरेल१९, प्रसिद्ध कृष्णा०, मोहम्मद सिराज ० धावा करू शकले. तर आकाश दीप ० धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडकडून गस अॅटकिन्सन २२ षटकात ३३ धावा देऊन ५ विकेट्स घेतल्या. तर जोश टंगने ३ विकेट्स घेतल्या. तसेच ख्रिस वोक्सने १ विकेट घेतली तर ओव्हरटन आणि जेकब बेथेल यांना विकेट्स घेण्यास अपयश आले.
हेही वाचा : ७० वर्षांच्या भारतीय क्रिकेटरची २८ वर्षाची लहान नवरी; वाढदिवशी नवरदेवाला देणार खास सरप्राईज; वाचा सविस्तर..
इंग्लंड प्लेइंग ११
जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप (कर्णधार), जो रूट, हॅरी ब्रूक, जेकब बेथेल, जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), ख्रिस वोक्स, गस अॅटकिन्सन, जेमी ओव्हरटन, जोश टंग.
भारत प्लेइंग ११
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), करुण नायर, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, मोहम्मद सिराज.