फोटो सौजन्य - England Cricket
इंग्लड विरुद्ध वेस्ट इंडिज : इंग्लंड संघ तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेला आहे. या मालिकेतील दुसरा सामना २ नोव्हेंबर रोजी खेळला गेला. इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज या सामन्याचे आयोजन सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर करण्यात आले होते. ज्यामध्ये दोन्ही संघांचे कर्णधार शाई होप आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी शतके झळकावली. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार लियाम लिव्हिंगस्टोनच्या शतकाने आपल्या संघाला शानदार विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ५ गमावून इंग्लंडने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.
वेस्ट इंडिजचा कर्णधार आणि विकेटकीपर शाई होप यांच्यात शतकी खेळी झाली. होपने 127 चेंडूत 92.13 च्या स्ट्राईक रेटने 117 धावा केल्या, ज्यात 8 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. दुसरीकडे, इंग्लंडचा कर्णधार लियाम लिव्हिंगस्टोनने वनडे कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. लिव्हिंगस्टोनने 85 चेंडूत 145.88 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 124 धावा केल्या, ज्यात 5 चौकार आणि 9 षटकारांचा समावेश होता.
Simply BRILLIANT!
A first ODI 100 for @liaml4893, and at the perfect time! 💯
Match centre: https://t.co/q1eOEABnWo
🌴 #WIvENG 🏴 | #EnglandCricket pic.twitter.com/j13JAXo2KY
— England Cricket (@englandcricket) November 2, 2024
प्रथम फलंदाजी करताना, वेस्ट इंडिज संघाने 50 षटकात 6 गडी गमावून 328 धावा केल्या. शाई होपने शतक झळकावून संघाला मजबूत स्थितीत आणले. त्याच्यासोबत केसी कार्टीने 71 धावा केल्या, तर शेरफेन रदरफोर्डने 54 धावांचे योगदान दिले. शेवटच्या षटकांमध्ये मॅथ्यू फोर्डने सलग तीन षटकार मारत धावसंख्या पुढे नेली आणि वेस्ट इंडिजला मजबूत लक्ष्यापर्यंत नेले.
हेदेखील वाचा – IND VS NZ : फलंदाजी करताय की टाईमपास? टीम इंडियाने गमावले दुसऱ्या इनिंगमध्ये ५ विकेट
प्रत्युत्तरात इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही आणि विल जॅक 12 धावा करून बाद झाला. यानंतर जॉर्डन कॉक्सही 4 धावा करून बाद झाला. त्यानंतर फिल सॉल्ट आणि जेकब बेथेल यांनी संघ ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. सॉल्टने 59 चेंडूत 59 तर बेथेलने 57 चेंडूत 55 धावा केल्या. सॉल्ट बाद झाल्यानंतर संघ थोडासा गडबडला, परंतु लिव्हिंगस्टोन आणि सॅम कुरन यांनी 107 चेंडूत 140 धावांची भागीदारी करून सामन्याचा मार्ग बदलला. इंग्लंडला शेवटच्या दहा षटकात 100 धावांची गरज असताना लिव्हिंगस्टोनने अवघ्या 28 चेंडूत 78 धावा करत संघाला विजयाच्या जवळ नेले. इंग्लंडने हा सामना १५ चेंडू शिल्लक असताना ५ विकेटने जिंकला.
पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या संघाने विजय मिळवला होता. त्यानंतर मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडच्या संघाने विजय मिळवून मालिकेमध्ये बरोबरी साधली आहे. या मालिकेचा तिसरा सामना ६ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा सामना मालिकेचा निर्णय घेईल. जो संघ या शेवटच्या सामन्यात विजय मिळवणार तो संघ मालिका नावावर करेल. शेवटच्या सामन्यात कोणता संघ विजय मिळवेल याकडे क्रिकेट प्रेमींचे लक्ष असणार आहे.