
मेलबर्नच्या क्रिकेट मैदानावर पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टी २० विश्वचषक स्पर्धेच्या फायनल सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक झाली असून यात इंग्लंडच्या कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरावे लागणार आहे.
सेमीफायनलमध्ये इंग्लंडने भारताला आधी कमी धावांत रोखून नंतर निर्धारीत लक्ष्य सहज पार केलं तसाच डाव आजही त्यांनी आखला आहे. पण दुसरीकडे पाकिस्तानची गोलंदाजी अत्यंत तगडी असल्याने सामना नक्कीच चुरशीचा होणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघानी एकही बदल न करता सेमीफायनलमध्ये खेळवलेलाच संघ आजही मैदानात उतरवला आहे. कारण दोन्ही संघानी मागील काही सामने तसंच सेमीफायनलमध्येही कमालीचा खेळ दाखवला.
पाकिस्तान संघ : बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, शादाब खान, शान मसूद, आसिफ अली, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी.
इंग्लंड संघ : जोस बटलर (कर्णधार), अॅलेक्स हेल्स, मोईन अली, हॅरी ब्रूक, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, फिलिप सॉल्ट, बेन स्टोक्स, ख्रिस जॉर्डन.