फाफ डूप्लेसी : इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या (Indian Premier League 2024) 52 वा सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगला होता. काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bengaluru) विरुद्ध गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यामध्ये लढत पाहायला मिळाली. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला आयपीएल 2024 चा चौथा विजय मिळवून देण्यात फाफ डू प्लेसिसने (Faf du Plessis) महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने आक्रमक फलंदाजी करत 23 चेंडूत 64 धावा केल्या. या खेळीत त्याने 10 चौकार आणि 3 षटकार मारले. या खेळीसह डु प्लेसिसने असा विक्रम केला जो विराट कोहली आणि ख्रिस गेलसारख्या दिग्गज फलंदाजांनाही साधता आला नाही.
कालच्या गुजरात टायटन्सच्या विरुद्ध फाफ डुप्लेसीने ६४ धावांची खेळी केली. त्याचबरोबर त्याने पॉवर प्लेमध्ये 50 पेक्षा जास्त धावा करणारा फाफ डू प्लेसिस पहिला आरसीबी फलंदाज बनला. याआधी हा विक्रम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा आणि वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू ख्रिस गेलच्या नावावर होता. ख्रिस गेलने 2012, 2013 आणि 2015 च्या मोसमात 50-50 धावा केल्या होत्या. पण आता कर्णधार फाफ डु प्लेसिसने गेलचा हा विक्रम मोडीत काढला आहे. गुजरातविरुद्धच्या सामन्यात डू प्लेसिस 5.5 षटकांत बाद झाला. म्हणजेच पॉवर प्ले संपण्यापूर्वी एका चेंडूवर तो पॅव्हेलियनमध्ये परतला.
आरसीबीसाठी पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
फाफ डू प्लेसिस- गुजरात टायटन्स विरुद्ध 64 धावा, 2024
ख्रिस गेल- 50 धावा विरुद्ध पुणे वॉरियर्स इंडिया, 2012
ख्रिस गेल- 50 धावा विरुद्ध पुणे वॉरियर्स इंडिया, 2013
ख्रिस गेल- 50 धावा विरुद्ध पुणे वॉरियर्स इंडिया, 2015.