श्रेयस अय्यरसमोर मोठे आव्हान (फोटो- सोशल मिडिया)
न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा असून, यादरम्यान कर्णधार श्रेयस अय्यरसमोर मोठे आव्हान असणार आहे. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत जी गोष्ट घडलेली नाही, ती या सामन्यात घडण्याची भीती क्रिकेट वर्तुळात वर्तवली जात असून, हा मान राखण्याची आणि विजयाची मालिका कायम ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी आता कर्णधार श्रेयस अय्यरच्या खांद्यावर असल्याचे म्हटले जात आहे.
भारतीय संघाची धुरा सांभाळणारा कर्णधार श्रेयस अय्यर याच्यासाठी हा सामना सोपा असणार नाही. T20 क्रिकेटच्या इतिहासात काही नकोसे विक्रम टाळणे आणि भारताची विजयी परंपरा कायम राखणे हे त्याच्यासमोर सर्वात मोठे टार्गेट असणार आहे. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात खेळवली जात असलेली रोमांचक टी20 सिरीज टप्प्यावर पोहोचली आहे.
उद्याचा सामना भारताला कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकावी लागणार आहे. भारताने आपल्या घरच्या मैदानावर वेस्ट इंडीजविरुद्ध एकही T20 मालिका गमावलेली नाही. त्यामुळे उद्याचा सामना भारताने गमावला तर ही परंपरा खंडित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्या भारताला उद्या सामना कोणत्याही स्थितीत जिंकणे आवश्यक असणार आहे.
भारतीय संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अभिषेक शर्मा, कुलदीप यादव, वैभव सूर्यवंशी, ईशान किशन, संजू सॅमसन, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, मयंक यादव, नमन धीर.
वेस्ट इंडिजचा संघ: शे होप (कर्णधार), कामिल पूरन, शिमरॉन हेटमायर, शेरफेन रदरफोर्ड, रोव्हमन पॉवेल, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, क्वेंटिन सॅम्पसन, अकील हुसैन, शमार जोसेफ, अमीर जांगू, गुडाकेश मोती, कीमो पॉल, मॅथ्यू फोर्ड, शमार स्प्रिंगर.
IND vs WI: पाचव्या टी-२० मध्ये पावसाचा खेळखंडोबा? विजयाचं स्वप्न भंगणार? बंगळुरूमध्ये वादळाचा अलर्ट






