IND Vs WI 5th T20
सूर्यकुमार यादवचा विक्रम आता इतिहासजमा! T20I मध्ये Abhishek Sharma बनला नवा ‘सिक्सर किंग’
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाचवा टी२० आंतरराष्ट्रीय सामना शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. दोन्ही संघ बंगळुरु येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर आमनेसामने येतीलहा सामना नेहमीप्रमाणे संध्याकाळी ७:०० वाजता सुरू होईल. त्याआधी ६:३० वाजता नाणेफेक होईल. चिन्नास्वामीची खेळपट्टी नेहमीच फलंदाजांसाठी फायदेशीर मानली असते. आयपीएलमध्ये या खेळपट्टीवर २५० पेक्षा जास्त धावा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात देखील आणखी एका मोठ्या धावसंख्येच्या सामन्याची अपेक्षा आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टेलिकास्ट होत आहेत. तुम्ही पाचवा टी२० सामना स्टार स्पोर्टसवर पाहू शकता. याशिवाय, हा सामना जिओहॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवरही प्रसारित केला जाईल. जर तुम्हाला मोफत सामना पाहायचा असेल तर डीडी फ्री डिशवरील डीडी स्पोर्ट्स चॅनलवर हा सामना विनामूल्य पाहता येईल.
भारतीय संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अभिषेक शर्मा, कुलदीप यादव, वैभव सूर्यवंशी, ईशान किशन, संजू सॅमसन, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, मयंक यादव, नमन धीर.
वेस्ट इंडिजचा संघ: शे होप (कर्णधार), कामिल पूरन, शिमरॉन हेटमायर, शेरफेन रदरफोर्ड, रोव्हमन पॉवेल, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, क्वेंटिन सॅम्पसन, अकील हुसैन, शमार जोसेफ, अमीर जांगू, गुडाकेश मोती, कीमो पॉल, मॅथ्यू फोर्ड, शमार स्प्रिंगर.
Ans: पाचवा टी-२० सामना शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे.
Ans: हा सामना बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
Ans: या सामन्याचे लाइव्ह अॅक्शन स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर आणि ऑनलाइन स्ट्रीमिंग जिओहॉटस्टारवर पाहता येईल.






